सातारा जिल्हा कारागृहाची आदरणीय जिल्हाधिकारी संतोष पाटलांकडून पाहणी..!! जिल्हा कारागृह अधीक्षकांचे केले विशेष कौतुक...!! मनीषा थोरात (स...
सातारा जिल्हा कारागृहाची आदरणीय जिल्हाधिकारी संतोष पाटलांकडून पाहणी..!! जिल्हा कारागृह अधीक्षकांचे केले विशेष कौतुक...!!
मनीषा थोरात (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज रोजी सातारा जिल्हा कारागृह येथे आदरणीय जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बोर्ड ऑफ व्हिजीटर्सची बैठक घेण्यात आली. सदर बोर्ड ऑफ व्हिजीटर्सच्या भेटी दरम्यान संपूर्ण कारागृहाची पाहणी करण्यात आली. या पाहणीमध्ये कारागृहातील बंदयांच्या काही अडचणी, समस्या, तक्रारी आहेत का? याची पाहणी करण्यात आली. बंदयांसाठी कारागृहात पुरेशी जागा आहे किंवा कसे याची पाहणी करून कारागृहातील नवीन बराक, बंदयांसाठी सुसज्ज ग्रंथालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे कायदेविषयक मार्गदर्शनासाठी क्लिनिक, बंदयांची कारागृहात घेतली जाणारी ओळख परेड यासाठी स्वतंत्र हॉल, सुरक्षेसाठी मोकळ्या जागेत शेड बांधणे, नवीन बराकवर सोलर रूट टॉप, सुरक्षा तपासणीसाठी एक्सरे मशीन, सीसीटीव्ही कंट्रोल रूम बांधणे, बंदयांच्या भेटीस येणाऱ्या नातेवाईकांसाठी वेटिंग रूम, वॉशरूम बांधणे, स्वातंत्र्यपूर्व काळात ज्यांनी कारावास भोगला त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ स्तंभ उभारणे व कारागृहाच्या अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी नवीन निवासस्थाने बांधणे या सर्व बाबींवर समर्पक चर्चा होऊन त्याचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेशित करण्यात आले.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी संपूर्ण कारागृहाच्या सुरक्षेची, बंदयांच्या अडीअडचणीची बारकाईने पाहणी करून कारागृहाच्या सुरक्षेसाठी ज्या-ज्या बाबींची आवश्यकता आहे, त्या सर्व बाबींची प्राधान्याने पूर्तता करण्याची हमी दिली.
सदर बैठकीस समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी संतोष पाटील, न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव निना बेदरकर, मुख्य शासकीय वकील महेश कुलकर्णी, पोलीस उपअधीक्षक अतुल सबनीस, जिल्हा शासकीय रुग्णालयचे डॉ. मोहोळकर, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, उपअभियंता प्रशांत खैरमोडे, अभियंता साईराज कुंभार, विद्युत अभियंता स्वप्नील पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उमेशचंद्र दंडगव्हाळ, परिविक्षा अधिकारी सुरत्राण, परिविक्षा अधिकारी नितीन इरकल तसेच कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी तात्यासाहेब निंबाळकर, सतीश कदम व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

No comments