adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रुग्णालयीन सुरक्षा सेवांना मुदतवाढ तसेच सुरक्षा रक्षकांचे थकीत वेतन देण्याबाबत आरोग्यमंत्र्यांना निवदेन

  रुग्णालयीन सुरक्षा सेवांना मुदतवाढ तसेच सुरक्षा रक्षकांचे थकीत वेतन देण्याबाबत आरोग्यमंत्र्यांना निवदेन मुंबई वृत्तान्त (संपादक -:- हेमकां...

 रुग्णालयीन सुरक्षा सेवांना मुदतवाढ तसेच सुरक्षा रक्षकांचे थकीत वेतन देण्याबाबत आरोग्यमंत्र्यांना निवदेन



मुंबई वृत्तान्त

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मुंबई, 26 जून : जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्हा शहरी उप. जि. रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांचे गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून थकीत असलेले वेतन देण्यात यावे तसेच रुग्णालयीन सुरक्षा सेवांना मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश

आबिटकर यांच्याकडे शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्यासह भाजप कामगार मोर्चाच्यावतीने करण्यात आली आहे.


आरोग्य मंत्र्यांना निवेदन -

राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची धुळ्याचे माजी आमदार शरद पाटील, भाजप कामगार मोर्चाचे रावेर पुर्वचे सरचिटणीस मिलिंद वाणी यांच्यासह सुरक्षा रक्षकांनी मंत्रालयात भेट घेतली. यावेळी जिल्हा शहरी उप. जि. रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांना मिळणेबाबत तसेच

रुग्णालयीन सेवांना मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी यावेळी निवदेनाच्या माध्यमातून मागणी करण्यात आली. यावेळी पंकज कोळी, वैभव कोळी, बाबासाहेब झाडे, भुषण महाजन, गोविंद महाजन, संजय महाजन, ईश्वर बडगुजर, किशोर बडगुजर, वैभव, आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटल्याप्रमाणे, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्हा येथे मंडळातील सुरक्षा रक्षक कार्यरत असुन त्यांची सेवामागील सन 2022-23 ते 2024 या कालावधी साठी होती. आता ही सेवासंपुष्टात आलेली आहे, तरी आपणास विनंती आहे. सुरक्षा सेवा विनाखंड सुरु रहाणे करीता मुदतवाढ देण्यात यावी. तसेच रुग्णालयीन अत्यावश्यक सेवे अंतर्गत सुरक्षा सेवा विनाखंड सुरू राहण्याकरिता योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.

No comments