गरुड फाउंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न पुरस्कारप्राप्त मान्यवरांना हा पुरस्कार नक्कीच प्रेरणादायी ठरेल - खा. लंके राहु...
गरुड फाउंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न
पुरस्कारप्राप्त मान्यवरांना हा पुरस्कार नक्कीच प्रेरणादायी ठरेल - खा. लंके
राहुरी / प्रतिनिधी:
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
गरुड फाउंडेशन आणि युवा ग्रामीण पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अण्णासाहेब शिंदे सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात राज्यभरातील विविध क्षेत्रांतील शेकडो मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक, कृषी, पत्रकारिता, क्रीडा, पर्यावरण, अध्यात्म आणि अन्य क्षेत्रांतील शेकडो मान्यवरांना सन्मानचिन्ह व सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली येथील सहाय्यक पोलीस आयुक्त व राहुरीचे भूमिपुत्र संदीप रमेश भांड हे होते. व प्रमुख उपस्थितीत नगर (दक्षिण) चे खासदार निलेश लंके, माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, यशवंत सेना जिल्हाध्यक्ष विजय तमनर, गरुड फाऊंडेशनचे अध्यक्ष आकाश पुजारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास बाचकर, पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण भोसले, सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे, सरपंच शेखर चोरघे, माजी सरपंच ज्ञानेश्वर बाचकर, सरपंच अप्पासाहेब, तमनर, हभप अमोल महाराज पिसे, हभप प्रेमानंद महाराज शास्त्री सह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
खासदार निलेश लंके यांनी गरुड फौंडेशनच्या कार्याचे कौतुक केले व पुरस्कारप्राप्त मान्यवरांना या सोहळ्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांना नवचैतन्य लाभले असून हे पुरस्कार त्यांच्या भावी वाटचालीस नक्कीच प्रेरणादायी ठरतील अशा प्रतिक्रिया दिल्या. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या भाषणात पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी आणखी प्रभावी समाजकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच "अशा पुरस्कारांमुळे कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळते आणि पुढील कार्यासाठी प्रेरणाही " मिळेल असे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन गरुड फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष रमेश खेमनर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी आयोजनासाठी रामचंद्र थोरात, रंगनाथ तमनर, अप्पासाहेब तमनर, पत्रकार अशोक मंडलिक, आर. आर. जाधव, पत्रकार जावेद शेख, सोमनाथ वाघ, कृष्णा गायकवाड, मनोज साळवे, शरद पाचरणे यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर.आर. जाधव यांनी केले, सूत्रसंचालन अप्पासाहेब ढोकणे यांनी केले, तर आभार अनिल 'डोलनर' यांनी मानले.
वृत्त विशेष सहयोग
पत्रकार जावेद शेख - राहूरी
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111


No comments