Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सुनील मेश्राम सर यांनी त्याविद्यार्थीची शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी

  सुनील मेश्राम सर यांनी  त्या विद्यार्थीची शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) सदर विद्यार्थी आनंद सुर...

 सुनील मेश्राम सर यांनी  त्याविद्यार्थीची शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

सदर विद्यार्थी आनंद सुरेश भिल वर्ग 4 थी जि. प. प्रा. शाळा न. 3 चोपडा शाळे मध्ये शिकतोय, मी एप्रिल महिन्यात सदर शाळेला भेट दिली असता वर्ग 3 री मध्ये सदर विद्यार्थ्याची भेट झाली. गणित क्रिया, वाचन, लेखन छान करीत होता. सहज वर्ग शिक्षिका यांचेशी या विद्यार्थी बाबत चर्चा केली असता, वर्ग शिक्षिका गायत्री पाटील यांनी सदर विद्यार्थी बाबत सांगितले कि याला आई वडील नाहीत लहान बहीण होती ती पण काही दिवसापूर्वी वारली काही आणि हा आजी कडे राहतो. याची परिस्थिती हलाकीची आहे. तेव्हा मी त्यांना शब्द दिला होता कि सदर विद्यार्थीची शिक्षणाची संपूर्ण जवाबदारी मी घेतोय, त्या शब्दाला जपून मी आज माझे सहकारी सोबती सोबत शाळेत जाऊन त्या विद्यार्थ्याला दप्तर, नोट बुक, पेन देऊन आलोय आणि मुख्याध्यापक श्री. केदार सर यांना आश्वस्त करून आलोय कि याची काही पण समस्या आल्यास पहिले मला कळविणे. मी अधून मधून त्याची भेट घेण्यासाठी नक्की येत राहील त्याच्या गरजा पुरविण्या साठी.मी माझं भाग्यच समजतो कि मला आनंद ची सेवा करण्याची संधी मिळाली त्यातून माझा आंनदोस्तव द्विगुणित झाला

सुनील मेश्राम सर 🙏

No comments