शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन गरजेचे- डॉ. दयाघन राणे सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक हेमकांत गायकवाड) मुक्ताईनगर येथील श्रीमती जी. जी...
शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन गरजेचे- डॉ. दयाघन राणे
सतिश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर येथील श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयात दिनांक ०५ जून २०२५ रोजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककामार्फत जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी डॉ. दयाघन राणे यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानातून शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन गरजेचे आहे व त्यासाठी आपण पर्यावरण संवर्धनात पुढाकार घ्यावा असे उपस्थितांना आवाहन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच. ए. महाजन यांनी उपस्थितांना पर्यावरणाविषयी जनजागृती निर्माण करून पर्यावरण संवर्धनात मोलाचा हातभार लावावा असा संदेश दिला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. डी. एन. बावस्कर यांनी केले. त्यात त्यांनी कार्यक्रमाची आयोजनामागील भूमिका व महत्त्व विशद केले. सूत्रसंचालन व आभार रासेयो स्वयंसेवकांनी मानले.या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व राष्ट्रीय सेवा योजना एककातील बहुसंख्य स्वयंसेवक उपस्थित होते.

No comments