ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव अंतर्गत पर्यावरण दिन साजरा जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील (संपादक -:-हेमकांत गायकवाड) ग्रामीण उद्या...
ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव अंतर्गत पर्यावरण दिन साजरा
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत जळगाव (गा.) ता.मालेगाव येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल अंतर्गत शासकीय उद्यानविद्या महाविद्यालय, काष्टी येथील सातव्या सत्रातील उद्यानदूतांची मालेगाव तालुक्यातील जळगाव (गा.) ता. मालेगाव जि. नाशिक येथे ३० मे रोजी आगमन झाले.याप्रसंगी ग्रामपंचायत मार्फत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले तसेच त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस.बी. नांदगुडे, डॉ.एस.पी.सोनावणे , डॉ. डी.आर. बिरारी , डॉ. आर. पी. खुळे, डॉ. पी. एन. सोनावणे, डॉ. आर. एल. पाटील आणि प्रा.अमोल भुकन, डॉ.एस. पी. देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानदूत पुढील तीन महिने या गावामध्ये राहून ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत प्रामुख्याने गावातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या पीक लागवड पद्धती, आधुनिक शेतीची 'माहिती यांचा अभ्यास करणार आहेत
तसेच कृषी विद्यापीठाने विकसित केलेले नवनवीन तंत्रज्ञान याविषयी प्रात्यक्षिके व मार्गदर्शन करणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर मात करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच दि. ०५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने विद्यार्थांनी गावामध्ये प्लास्टिक प्रदूषणावर कश्या प्रकारे मात करता येईल यासंबंधी मार्गदर्शन करून प्लास्टिक मुक्ती कशी करता येईल. याची माहिती गावकऱ्यांना दिली. त्याचप्रमाणे वृक्ष लागवड करून वृक्षलागवडीचे महत्व पटवून दिले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जळगाव (गा.) चे सरपंच श्रीमती. द्रोपदाबाई वसंत मगरे, उपसरपंच श्री. आत्माराम गेंद, ग्रामसेवक श्रीमती.डी.आर. गवळी त्याचप्रमाणे सदर कार्यक्रम राबविण्यासाठी उद्यानदूत माळी विशाल,हिरे तेजस, हिरे ललित, हिरे जितेंद्र,खांडे प्रतिक,कुवर गौरव, घाटे अनिकेत यांनी अथक प्रयत्न केले.

No comments