स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बहुजन समाज पार्टी स्वबळावर लढवण्या साठी सज्ज... चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज दिनां...
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बहुजन समाज पार्टी स्वबळावर लढवण्या साठी सज्ज...
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज दिनांक 12/06/2025 गुरुवार रोजी जळगाव येथे बहुजन समाज पार्टी ची जिल्हा कार्यकारणी ची बैठक संपन्न झाली. जिल्हाध्यक्ष भिमराव खैरे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की आगामी काळात होऊ घातलेल्या महानगर पालिका, नगर पालिका, नगर पंचायत, जिल्हयातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संपूर्ण जागा आगामी निवडणुकी मध्ये स्वबळावर लढवणार.
सदर प्रसंगी जिल्हा महासचिव सचिन अशोक बाविस्कर,जि प्रभारी भाईदास बाविस्कर, जि बीव्हीफ संयोजक विलास लुले, जि. प्रभारी मंगेश पाटील, रावेर विधानसभाध्यक्ष, ईश्वर जाधव, चोपडा विधानसभा कोषाध्यक्ष सुरेश बारेला, इतर तसेच कार्यकर्ता हे उपस्थित होते

No comments