adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शेतकरी कृती समिती बच्चू कडू यांचे पाठीशी मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफी करावी व त्यांचे आंदोलन थांबवावे यासाठी तहसीलदार यांना निवेदन.....

  शेतकरी कृती समिती बच्चू कडू यांचे पाठीशी मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफी करावी व त्यांचे आंदोलन थांबवावे यासाठी तहसीलदार यांना निवेदन.......

 शेतकरी कृती समिती बच्चू कडू यांचे पाठीशी मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफी करावी व त्यांचे आंदोलन थांबवावे यासाठी तहसीलदार यांना निवेदन.....


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मा बच्चू भाऊ कडू यांनी आरंभलेल्या अन्नत्याग आंदोलनाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेऊन त्यांच्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी शेतकरी कृती समितीने  तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

   निवेदनात शेतकऱ्यांच्या कापूस,सोयाबीन सह साऱ्या प्रश्नावर मा मुख्यमंत्री हे विरोधी पक्षात असताना आंदोलने करायचे, त्या वेळच्या शेतमालाच्या बाजारभावात आज ही फरक पडलेला नाही, तेच भाव १०वर्षानंतर आहेत.तेव्हाही तो परवडत नव्हता ,आज तर तीन पट रासायनिक खतांचे व मजुरीचे दर वाढलेत, त्या सोबत ही पेक्षा जीवन जगण्याचा खर्च देखील प्रचंड वाढला.त्यामुळे शेतकरी मेटाकुटिस आला आहे हे आपणास व आपल्या कार्यकर्त्यांना देखील ज्ञात आहे,अशी आठवण देखील करून देण्यात आली आहे.

    आज ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरले ते देखील पत टिकवण्यासाठी उचल दडप करून त्यासाठी साऱ्याच शेतकऱ्यांचे थकीत किंवा विना थकीत(चालू) माफ करून त्यांना नवीन उभे करण्यासाठी मदत व्हावी व

निवडणुकी आधी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव व शेतकरी कर्जमाफी चे आपण दिलेले आश्वासन पाळून राजकारणी शब्द देतात तो पाळण्यासाठी हे जनतेला दाखवून द्या,अन्यथा राजकारणी फक्त सत्ता टिकवण्यासाठी खोटे बोलून जनतेला फसवतात ही धारणा पक्की होईल अशी भावना देखील निवेदनात व्यक्त केली असून तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी स्वीकारले यावेळी एस बी पाटील,प्रशांत पाटील, प्रा प्रदीप पाटील,चंद्रकांत पाटील,कुलदीप पाटील,कुलदीप राजपूत,अजित पाटील हजर होते.

No comments