गणवेश विक्री करणाऱ्या दुकानदांवर शाळा प्रशासनाने लक्ष घालावे. नमस्कार मित्रांनो मी आज आपल्या पुढे एक नवीन विषय घेऊन आलोय आपली भेट बऱ्याच द...
गणवेश विक्री करणाऱ्या दुकानदांवर शाळा प्रशासनाने लक्ष घालावे.
नमस्कार मित्रांनो मी आज आपल्या पुढे एक नवीन विषय घेऊन आलोय आपली भेट बऱ्याच दिवसांपासून नाही झाली याबद्दल मि आपली दिलगिरी व्यक्त करतो बरं आता मि जो विषय घेऊन आलोय तो असा. समस्त महाराष्ट्र भरात शाळा कॉलेज नव्या शैक्षणिक वर्षापासून सुरू झाल्या असून पालक आपल्या मुलांना नविन गणवेश खरेदी करतात. याबद्दल मि विषय मांडतोय काल मि मुलांना घेऊन तालुक्याला गेलो होतो कारण होतं शाळा सुरू झाल्या आता दप्तर (बॅग), वह्या, पुस्तके, गणवेश खरेदी साठी सर्वच पालकांची लगबग सुरू होती. आता तुम्ही म्हणाल यात काय नविन तर नविन असं होतं मि वह्या, पुस्तके, दप्तर (बॅग), घेऊन गणवेश खरेदी साठी एका दुकानात गेलो तेथे सर्व गर्दी होती ती पालकांची आपल्या पाल्यांना घेऊन गणवेश खरेदी साठी माझ्या माहिती नुसार काही निवड दुकानांमध्ये शाळेचे गणवेश मिळतात पण काही शाळांनी जसे खासगी शाळा, संस्थेच्या शाळा, ( जि.प.च्या सर्व शाळा वगळता) शाळेचे एकाच दुकानातून गणवेश खरेदी साठी पालकांना जावे लागते विशेष म्हणजे यात कुणाचा फायदा हे कळतच नाही कारण दुसऱ्या दुकानावर गणवेश खरेदी साठी गेलो तर तो तिथं मिळत नाही यामुळे परत त्याच दुकानात खरेदी साठी जाव लागते आज एका पालकांनी गणवेश घेतांना दुकानदाराला सांगितले कि कापड बरोबर नाही व केलेली शिलाई सुध्दा चांगली नाही यावर त्या दुकानदाराने सांगितल सर घ्यायचा असेल तर घ्या ते पालक दोन दुकान फिरुन परत तेथेच आले व तो गणवेश खरेदी केला याचे वर शाळा प्रशासनाने लक्ष घालायला हवं दोन तिन दुकानात जर गणवेश मिळाले तर पालकांचे ही दोन पैसे वाचतील एकच किंमत सांगितली कि त्याच किंमतीत गणवेश घ्यावा लागतो तर संबंधित शाळांचे गणवेश एकाच दुकानावर कसे यांना कुणी परवानगी दिली कि फक्त एक दुकानदार गणवेश विकू शकतो बाकी का नाही जो विकतो तो कोणत्या प्रकारचे कापड आणतो शिलाई कशी करतो हे शाळा दरवर्षी चेक करतात का ? किंमत किती घेतो पालकांशी कसा संवाद साधतो हे तरी शाळा प्रशासनाने माहिती घेतली आहे का अशी एक ना अनेक प्रश्न निर्माण होतात. बाजारात खरेदी साठी गेलो तर भाजीपाला, किराणा, फळ हेच काय तर साधे रेडिमेड कपडे घेतले तरी किंमत कमी जास्त करता येते मग गणवेशला एकच भाव का तो हि दुकानदार देईल तोच कापड तिच शिलाई तिच किंमत अशी बळजबरी का यावर कुणी लक्ष देईल का कि दुकानदार व शाळा प्रशासन यांची काही मिलीभगत आहे अशी शंकाही संबंधित पालकांनी व्यक्त केली मि जेंव्हा त्यांचेशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले मि आपणास ओळखतो आपण आमचा आवाज तुमच्या माध्यमातून संबंधित प्रशासना पर्यंत पाठवा व हि चाललेली गळचेपी थांबवा कारण जर दोन, तिन दुकानात जर गणवेश मिळाले तर गणवेश खरेदी करतांना कापड चांगल्याप्रकारे मिळेल तर एकच भाव राहणार नाही किंमत कमी जास्त करता येईल अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली
(टिप -:- सर्वच शाळा बद्दल मि म्हटलेल नसुन मि दुकानात ज्या ज्या शाळेचे पालकांशी संवाद साधला त्या बद्दल लिहिले आहे सर्व शाळा सारख्या नसतात यात माझं दु मत नाही)
शामसुंदर सोनवणे
नेशन महाराष्ट्र व्यवस्थापकीय संपादक
मो.8208449983

No comments