चोपडा तालुक्यासाठी शासकीय गोदाम लोकार्पण सोहळा मौजे चहार्डी येथील नूतन गोदामात संपन्न यावेळी नविन वजन काटा भूमिपूजन देखील करण्यात आले. च...
चोपडा तालुक्यासाठी शासकीय गोदाम लोकार्पण सोहळा मौजे चहार्डी येथील नूतन गोदामात संपन्न
यावेळी नविन वजन काटा भूमिपूजन देखील करण्यात आले.
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
गोदामासाठी विशेष लक्ष देऊन मंजुरी आणणाऱ्या माजी आमदार लताताई सोनवणे,आमदार चंद्रकांत सोनवणे,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील,तहसीलदार भाऊसाहेब थोरात,सार्वजनिक बांधकाम विभाग उप अभियंता वीरेंद्र राजपूत,पुरवठा तपासणी अधिकारी किरण मेश्राम,पुरवठा निरीक्षक मेघना गरुड व गोदाम व्यवस्थापक योगेश ननवरे यावेळी उपस्थित होते.
नाबार्डच्या रु.५.०० कोटी अर्थसहाय्यातुन १८०० मॅट्रिक टन क्षमतेचे गोदाम पूर्ण झाल्यामुळे चोपडा येथील जुन्या गोदामातून होणारे कामकाज आताचे नूतन सुसज्ज गोदामातून होणार आहे.
निसर्गरम्य परिसरात सुरक्षा रक्षक केबिन,विद्युत व्यवस्था,वजन काटा या सर्व सुविधा गोदामात देण्यात आल्या आहेत.
शासन निर्देशानुसार तिप्पट क्षमतेचे गोदाम निर्माण झाल्यामुळे सर्व स्वस्त धान्य दुकानदार व परिणामी लाभार्थी यांना विविध वेळेत अन्नधान्य पुरवठा करणे शक्य होणार आहे,गोदामाचे जवळच औद्योगिक महामंडळाचे जागेवर लवकरच भूखंड वाटप होणार आहे त्यामुळे या परिसरात औद्योगिक विकास देखील दृष्टिक्षेपात आहे असे माननीय आमदार यांनी आपले मनोगतामध्ये स्पष्ट केले.


No comments