adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आंतरराष्ट्रीय योग दिवस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात उत्साहात साजरा

  आंतरराष्ट्रीय योग दिवस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात उत्साहात साजरा गडखांब प्रतिनिधी (संपादक -;-हेमकांत गायकवाड) 21 जून 2025 रोजी  म...

 आंतरराष्ट्रीय योग दिवस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात उत्साहात साजरा


गडखांब प्रतिनिधी

(संपादक -;-हेमकांत गायकवाड)

21 जून 2025 रोजी  माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय नगाव गडखांब येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेतील क्रीडा शिक्षक एस.एल.मनुरे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे विविध आसने प्रात्यक्षिकाद्वारे समजावून दिली व योगाचे महत्त्व सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. टी एन बोरसे सर, व सर्व शिक्षक- शिक्षकेतर सहभागी यांनीही योगासनांचा आनंद घेऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. योगा दिनाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती तसेच मानसिक शांती साध्य करण्याचा संदेश पोहोचवण्यात यश मिळाले. शाळेतील या प्रयत्नांनी योगाची महती व नियमित सरावाचे फायदे याबाबत जनजागृती केली आहे.

No comments