मटका बुकींवर विशेष पोलीस पथकाचा छापा..10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत..तब्बल 35 आरोपींवर गुन्हा दाखल सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत...
मटका बुकींवर विशेष पोलीस पथकाचा छापा..10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत..तब्बल 35 आरोपींवर गुन्हा दाखल
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात दोन बड्या मटका बुकीवर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने कारवाई करत 10 लाख 46 हजार 310 रू.किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत 35 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.हि कारवाई 20 जून 2025 रोजी पथकाने केली आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधिन उपाधीक्षक संतोष खाडे,पोसई.राजेंद्र वाघ,पोलीस अंमलदार शंकर चौधरी,अजय साठे,अरविंद भिंगारदिवे मल्लिकार्जुन बनकर,दिनेश मोरे, उमेश खेडकर,सुनील पवार, सुनील दिघे,अमोल कांबळे, जालिंदर दहिफळे यांनी केली आहे.

No comments