भोरटेक शिवारात अवैध वृक्षतोड करून वाहतुक करणारे वाहन वनविभागाने केले जप्त भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : त...
भोरटेक शिवारात अवैध वृक्षतोड करून वाहतुक करणारे वाहन वनविभागाने केले जप्त
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : तालुक्यातील भोरटेक शिवारात अवैध वृक्ष तोड सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्या वरून वनविभागाने गस्त घालत एक पिकअप वाहन ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. मा.वनपरिक्षेत्र अधिकारी, गस्ती पथक यावल भोरटेक शेत शिवारात अवैध वृक्षतोड बाबत तक्रार प्राप्त झाली होती या तक्रारी अर्जा नुसार गस्ती पथक स्टाफ व आगार रक्षक यावल यांच्या सह यावल भुसावळ रस्त्याने गस्त करीत असतांना संशयित पिंकअप क्रमांक MHAG-3157 वाहनांची तपासणी केली असता वाहणात निंब,बाभुळ जळाऊ लाकूड माल वाहतूक करीत असतांना मिळुन आले, वाहन चालक ज्ञानेश्वर कोळी यांना सदर मालाची वाहतुक पास बद्दल विचारना केली असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा वाहतूक परवाना मिळून आला नाही. सदरील वाहन तसेच निंब,बाभूळ जळाऊ लाकूड माल घ.मी 1.000 भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41 (2 ब) 52 अन्वये व महाराष्ट्र नियमावली 2014 चे नियम 31,82 अन्वये जप्त निंब जळाऊ घन मीटर 1.000 माल किंमत 854/- रु तसेच वाहन किंमत अंदाजे 1,45,000/- एकूण 145854/- इतकी असुन मुख्य विक्री केंद्र यावल येथे जमा केला. गुन्हे कामी गस्ती पथक यावल यांनी गुन्हा क्रमांक 07/2025 दिनांक.09/06/2025 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून सदरील कारवाई ही मा.उप वनसंरक्षक सो. यावल वन विभाग जळगाव, सहाय्यक वन संरक्षक सो. (प्रादेशिक व कॅम्पा) यावल, मा.वनपरिक्षेत्र अधिकारी सो गस्ती पथक यावल , यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कार्यवाही दरम्यान आगार रक्षक यावल बी.बी. गायकवाड,वनरक्षक गस्ती पथक आय.बी चव्हाण तसेच पोलीस (कॅा)एस.आर तडवी वाहन चालक योगीराज तेली उपस्थित होते.

No comments