adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अल्पवयीन पीडित मुलीची एमआयडीसीतून सुटका, एमआयडीसी पोलिसांची कारवाई..आरोपी झारखंड पोलिसांच्या ताब्यात

  अल्पवयीन पीडित मुलीची एमआयडीसीतून सुटका, एमआयडीसी पोलिसांची कारवाई..आरोपी झारखंड पोलिसांच्या ताब्यात  अहिल्यानगर प्रतिनिधी (संपादक -:- हेम...

 अल्पवयीन पीडित मुलीची एमआयडीसीतून सुटका, एमआयडीसी पोलिसांची कारवाई..आरोपी झारखंड पोलिसांच्या ताब्यात 


अहिल्यानगर प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

झारखंड येथील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून आणणाऱ्या आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी (दि.४ जून) रोजी नागापूर एमआयडीसी येथून ताब्यात घेतले आहे.आरोपीच्या ताब्यातून पीडित मुलीची सुटका करण्यात आली आहे.मथान उमेश मुरुमाऊ (वय.२०, रा.दुलाडे, जि. जमदडा, झारखंड), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनी.माणिक चौधरी यांना मिळालेल्या माहितीनुसार झारखंड येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून त्या मुलीला नागापूर एमआयडीसी येथे आणले असल्याची खात्रीशीर माहिती मिलाळी

ही माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चौधरी यांनी पोलीस अंमलदारांना  घटनेची माहिती दिली.त्यानुसार पो.नि.चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून पीडित मुलीची सुटका करून आरोपीला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक देविदास भालेराव,अंमलदार सुशांत दिवटे,गणेश कावरे, भास्कर मिसाळ,बंडू भागवत, किशोर जाधव,अक्षय रोहकले, नवनाथ दहिफळे, सोनाली जाधव यांच्या पथकाने केली.

No comments