adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आयशर ट्रक व दुचाकीच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू मोठा वाघोदा - वडगांव रस्त्यावर भीषण अपघात

  आयशर ट्रक व दुचाकीच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू    मोठा वाघोदा - वडगांव रस्त्यावर भीषण अपघात  रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:- ह...

 आयशर ट्रक व दुचाकीच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू   

मोठा वाघोदा - वडगांव रस्त्यावर भीषण अपघात


 रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मोठा वाघोदा - वडगाव  दरम्यान सावदा-बुरहानपूर अंकलेश्वर महामार्गावर ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात रावेर तालुक्यातील रणगाव येथील दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील चोरवड चेकपोस्टवर पळून जाण्याचा प्रयत्न करताना ट्रक आणि चालकाला  सावदा पोलीसांनी पकडले 


बुरहानपूर अंकलेश्वर महामार्गावर सुकीनदी जवळपास मोठा वाघोदा गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ, सावदा येथून केळी घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकने रावेर तालुक्यातील रणगाव येथील रहिवासी नितीन धनराज कोळी आणि नितीन रामलाल कोळी यांना समोरासमोर धडक दिली. हे दोघेही लग्न समारंभाला उपस्थित राहून दुचाकीवरून घरी परतत होते. दोघेही ४० वर्षांचे होते. रणगाव येथील रहिवासी असलेले दोघेही या अपघातात जागीच ठार झाले.

अपघातानंतर ट्रकचालक ट्रक पळवून नेऊन जाण्याचा प्रयत्न करत पळून गेला पण तो मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवर पकडला गेला आणि ट्रक सावदा पोलिस ठाण्यात आणण्यात आला. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रावेरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.

या घटनेमुळे तापी नदीच्या काठावर असलेल्या रणगाव परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेचा पुढील तपास सावदा पोलिस ठाण्याचे एपीआय विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल नीलेश बाविस्कर यांच्यासह पोलिस कर्मचारी करत आहेत.

No comments