adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बुऱ्हाणपूर येथिल जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र - मध्यप्रदेश सीमेवर प्रवाशांना होणाऱ्या गैरसोय बाबत बैठक

  बुऱ्हाणपूर येथिल जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र - मध्यप्रदेश सीमेवर प्रवाशांना होणाऱ्या गैरसोय बाबत बैठक  जळगाव प्रतिनिधी (संपादक -...

 बुऱ्हाणपूर येथिल जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र - मध्यप्रदेश सीमेवर प्रवाशांना होणाऱ्या गैरसोय बाबत बैठक 


जळगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगांव जिल्ह्यातून बुऱ्हाणपूर जाणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांची महाराष्ट्र - मध्यप्रदेश सीमेवर मध्यप्रदेश पोलिस मार्फत अडवणूक होऊन त्रास देण्यात येत असल्याबाबत अनेक तक्रारी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्याकडे आल्या असता,आज बुऱ्हाणपूर येथिल जिल्हाधिकारी कार्यालय येथे केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी आमदार अर्चनादिदी चिटणीस यांच्यासह बुऱ्हाणपूर पोलिस अधीक्षक देवेन पाटीदार,उपजिल्हाधिकारी श्री.वीरसिंग तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तक्रार केली.


यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे महाराष्ट्र राज्यातील वाहन धारक व प्रवाश्यांना होण्याच्या त्रासाची माहिती देऊन यावर तत्काळ सुधारणा करणे बाबत सूचना केल्या.यावर लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.

No comments