विरावली गावात प्राण्यांच्या लसीकरण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) विरावली, 27 जून रोज...
विरावली गावात प्राण्यांच्या लसीकरण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
विरावली, 27 जून रोजी विरावली गावात प्राण्यांसाठी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आणि त्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी आणि पाळीव प्राण्यांच्या मालकांनी सहभाग घेतला.
या शिबिरात गायी, म्हशी, यांसारख्या विविध प्राण्यांना रोगप्रतिबंधक लसी टोचण्यात आल्या. लसीकरणामुळे त्यांच्या आरोग्याचे संरक्षण होणार असून, रोगप्रसार रोखण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमाचे आयोजन विरावली पशुसंवर्धन विभाग डॉ. सुप्रिया कर्दीले, डॉ. युवराज अळकमोल व महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी अंतर्गत डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, प्रा. बी.एम.गोणशेटवाड व प्रा. एम.पी.भोळे यांच्या मार्गर्शनाखाली कृषीकन्या धनश्र्वेता अहिरे, प्रज्ञा गजरे, ऐश्वर्या सोनवणे, सृष्टी डोंगरे, प्रतीक्षा गावीत, विशाखा सोनवणे यांनी विरावली ता. यावल येथे करण्यात आले होते. शिबिरात प्रामुख्याने गोचीड,घटसर्प,त्वचारोग यांसारख्या आजारांच्या लसी देण्यात आल्या.
या उपक्रमामुळे गावात प्राणी आरोग्याबाबत जनजागृती वाढली असून, भविष्यात असे उपक्रम वारंवार व्हावेत अशी ग्रामस्थांची इच्छा आहे.
No comments