मनवेल ते खंडवा पायी दिडींचे शुक्रवारी होणार प्रस्थान भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मनवेल ता यावल : मनवेल येथील ...
मनवेल ते खंडवा पायी दिडींचे शुक्रवारी होणार प्रस्थान
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मनवेल ता यावल : मनवेल येथील धुनीवाले दादाजी दरबार तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मनवेल येथून खंडवा येथील धुनीवाले दादाजी दरबार येथे पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ही दिंडी शुक्रवार ४ जुलै रोजी प्रस्थान ठेवेल व ९ जुलै रोजी मध्य प्रदेशातील खंडवा येथे पोहचेल. या दिंडीचे ३७ वे वर्ष असुन दिंडीत सहभागासाठी नाव नोंदणी सुरू आहे.
मनवेल येथील धुनीवाले दादाजी दरबाराच्या वतीने गेल्या ३६ वर्षांपासून अखंडितपणे मध्य प्रदेशातील खंडवा येथे पायी दिंडीची परंपरा सुरू आहे. यंदा देखील शुकवारी ४ जुलै रोजी सकाळी ७ वाजता पालखी प्रस्थान ठेवणार आहे. पालखीचे पूजन दादाजी दरबारात ७ वाजेला होईल त्यानंतर गावात मिरवणूक काढुन दिंडी खंडवा मध्य प्रदेशाकडे मनवेल येथून प्रस्थान ठेवेल. तर त्याच दिवशी शुक्रवारी यावल येथे मुक्काम, ५ जुलै रोजी सावदा मुक्काम, ६ जुलै रोजी निरुळ येथे मुक्काम, ७ जुलै रोजी असिरगड (म.प्र.) येथील देवीच्या मंदिरात व ८ जुलै रुस्तमपुर (म.प्र.) येथे गुप्तेश्वर महादेव मंदीर मुक्काम केल्यानंतर ९ जुलै रोजी दिंडी खंडवा येथे दाखल होणार आहे.
यासाठी धुनीवाले दादाजी दरबारतर्फे नियोजन केले जात आहे. त्यामुळे तालुक्यासह परिसरातील जास्तीत जास्त संख्येने भाविकांनी या पायी दिंडीत सहभागी होण्यासाठी संतोष दौलत पाटील, गजानन योगराज पाटील, सुभाष अशोक पाटील, पन्नालाल हुकुमचंद पाटील, सोपान आधार पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन दादाजी धुनीवाले दरबार, मनवेल यांनी केले आहे.
No comments