जे. टी. महाजन इंग्लिश स्कुलमध्ये शाळेचा पहिला दिवस "प्रवेशोत्सव"साजरा भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...
जे. टी. महाजन इंग्लिश स्कुलमध्ये शाळेचा पहिला दिवस "प्रवेशोत्सव"साजरा
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे. टी. महाजन इंग्लिश स्कुलमध्ये शाळेचा पहिला दिवस "प्रवेशोत्सव"साजरा करण्यात आला. या निमित्त शाळेला सुंदर बलून व डेकोरेशनने सजवण्यात आले या निमित्त शाळेच्या प्राचार्य श्रीमती रंजना महाजन मॅडम या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. तसेच इंग्लिश मेडियमच्या प्राचार्य श्रीमती दिपाली धांडे मॅडम उपस्थित होत्या. या कार्यक्रमाची सुरुवात गणेश व सरस्वतीच्या प्रतिमेची पूजा करून करण्यात आली. तसेच शाळेतील नर्सरी ज्युनियर, सीनियर च्या मुलांना 'क्राऊन' घालून फुलांचे गुच्छ व आकर्षक गिफ्ट देऊन स्वागत करण्यात आले. तसेच मुलांसोबत शिक्षकांनी वेगवेगळे खेळ घेऊन मुलामध्ये शाळेबद्दल उत्साह निर्माण केला.
अशा प्रकारे मुलांमध्ये "आनंददायी शाळा "निर्माण करण्यात आली.
No comments