गावात शव पेटी लवकर उपलब्ध करून देण्यात यावी प्रहार जनशक्ती पक्षाची लोणवडी ग्रामपंचायतला निवेदनाद्वारे मागणी अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक ...
गावात शव पेटी लवकर उपलब्ध करून देण्यात यावी प्रहार जनशक्ती पक्षाची लोणवडी ग्रामपंचायतला निवेदनाद्वारे मागणी
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
मलकापूर:- गावात कोणाचे निधन झाल्यास त्या निधन झालेल्या व्यक्तीचे नातेवाईक खूप लांब असल्या कारणाने मृतदेह अंत्यसंस्कार करायला खूप उशीर लागत असून त्याचा मृतदेह काही वेळ घरात ठेवण्यासाठी शव पेटीची आवश्यकता असते त्यासाठी दुःखात जीवाची धावपड करून शहरात जावे लागते तिथं पण एखाद्या ठिकाणी वेळेवर शव पेटी उपलब्ध नसल्यास दुसरीकडून कुठ मिळेल यासाठी शोधत बसावे लागते दुःखाच्या डोंगरात त्यांना त्रासदायक कसोटीचा सामना करावा लागतो या वरील विषयाचे गांभीर्य लक्ष्यात घेता प्रहार वतीने निवेदनाद्वारे ग्रामपंचायत मध्ये ठराव लवकर घेऊन गावासाठी आवश्यकता असलेली शव पेटी लवकरात लवकर उपलब्ध करून या गावच्या सेवाकार्यात आपण योगदान द्यावे अशी निवेदन देऊन मागणी केली निवेदन देते वेळी प्रहार सेवक अजाबराव वाघ, शाखा उपप्रमुख रवींद्र पाटील,समाज सेवक कृष्णा बावस्कार व प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments