ऋतुजा सोनवणेच्या शास्त्रीय संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार प्रदान चोपडा प्रतिनिधी (...
ऋतुजा सोनवणेच्या शास्त्रीय संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार प्रदान
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
हातेड खु!! ता. चोपडा येथील रहिवाशी तर नाशिकच्या बी. वाय. के. वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. ऋतुजा हंसराज सोनवणे हिने शास्त्रीय संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय अशा कामगिरीमुळे 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२४-२५' प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार छत्रपती संभाजीनगर येथील रुक्मिणी सभागृह, एमजीएम परिसरात संपन्न झाला या भव्य सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण सेंटरचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव कदम होते. कार्यक्रमास डॉ. विलास सपकाळ (कुलगुरू), डॉ. आशिष गाडेकर (कुलसचिव), डॉ. अपर्णा कक्कड (कार्यकारिणी सदस्य), कवी दासू वैद्य,
नीलेश राऊत, केतकी नेवपुरकर, गौरव सोमवंशी, संतोष मेकाळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या पुरस्काराचे आयोजन यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने गेल्या २६ वर्षांपासून राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये विधायक व भरीव कार्य करणाऱ्या युवक-युवतींचा गौरव करण्यासाठी करण्यात येते. ऋतुजाच्या या यशाबद्दल तिचे सर्वस्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
ऋतुजा ही श्री शिवाजी हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक एल. एन. सोनवणे यांची नात व हंसराज लहानु सोनवणे आणि सविता सोनवणे यांची कन्या आहे. तिच्या यशाबद्दल माजी आ. दिलीपराव सोनवणे, आर.एच.बाविस्कर, मुख्याध्यापक पी. सी. पाटील, प्रा. महेंद्र बोरसे, एस.बि बोरसे, गौरव प्रकाश सोनवणे, नरेश पाटील (भाऊसाहेब), माजी उपसरपंच अनिल अमृतराव पाटील, प्रविण शंकरराव सोनवणे, पंजाबराव बाविस्कर, संदिप देविदास सोनवणे यांनी ऋतुजाचे अभिनंदन केले.

No comments