जात प्रमाणपत्राचा भोंगळ कारभार एका व्यक्तीने मिळवले 'टाकणकर' अनुसूचित जमातीचे बनावट प्रमाणपत्र जय वळेखण आदिवासी विकास संघटनेचे आदि...
जात प्रमाणपत्राचा भोंगळ कारभार एका व्यक्तीने मिळवले 'टाकणकर' अनुसूचित जमातीचे बनावट प्रमाणपत्र
जय वळेखण आदिवासी विकास संघटनेचे आदिवासी संशोधन आयुक्तांना निवेदन
अमरावती प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अमरावती अनुसूचित जमातीच्या हक्कांवर घाला घालणारा गंभीर प्रकार समोर आला आहे. एका मुस्लिम व्यक्तीने ‘टाकणकर (३८)’ अनुसूचित जमातीचे खोटे जात प्रमाणपत्र मिळवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला असून, या संदर्भात “जय वळेखण आदिवासी विकास संघटने” तर्फे पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले आहे सदर प्रकरणातील आरोपी इमाडोद्दीन वजिदोद्दीन शेख याने दि. 13 फेब्रुवारी 2017 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील जात पडताळणी समितीकडे अर्ज सादर केला होता. मात्र तब्बल सात वर्षांनी, दि. 14 नोव्हेंबर 2024 रोजी त्याचे प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने जनरेट झाले, ही बाब अत्यंत संशयास्पद असून, प्रशासकीय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे सदर व्यक्तीने अर्जात स्वतःचा धर्म 'मुस्लिम' असा स्पष्टपणे नमूद केला असूनही त्याला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळाले आहे, ही घटना घटनाविरोधी, समाजविरोधी आणि आदिवासी बांधवांच्या हक्कांवर अन्याय करणारी आहे, असा ठपका संघटनेने निवेदनातून ठेवला आहे टाकणकर (३८)’ ही जमात पारधी समाजाशी संबंधित असून त्यांची पारंपरिक भाषा 'वाघरी' आहे. इमाडोद्दीन याने अर्जात 'उर्दू व हिंदी' भाषा नमूद केल्या आहेत, ज्याचा त्या समाजाशी काहीही संबंध नाही. याशिवाय त्याच्याकडे कोणत्याही आदिवासी परंपरागत संस्थेची शिफारसही नाही. त्यामुळे त्याने खोट्या माहितीच्या आधारावर हे प्रमाणपत्र मिळवले आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे जय वळेखण आदिवासी विकास संघटने चे जिल्हाध्यक्ष सोम प्रताप सोळंके, तसेच लक्ष्मण सोळंके, दिनेश मालवे, रोहित झाकर्डे, रविंद्र राठोड जिल्हा उपाध्यक्ष शिवसिंग पवार सचिव आणि प्रतापसिंग पवार सुमित झाकक्षर्डे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.
No comments