adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भाऊसाहेब वाकचौरे हे राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्काराने सन्मानित

  भाऊसाहेब वाकचौरे हे राज्यस्तरीय  ध्येयरत्न पुरस्काराने सन्मानित    जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील  (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  कळस ...

 भाऊसाहेब वाकचौरे हे राज्यस्तरीय  ध्येयरत्न पुरस्काराने सन्मानित  


 जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 कळस गावचे माजी सरपंच, पत्रकार भाऊसाहेब वाकचौरे यांना सामाजिक कार्य व पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ध्येय उद्योग समूहाच्या वतीने पुरस्कार सोहळा आयोजित केला होता.

       संगमनेर येथे सह्याद्री विद्यालयाच्या के. बी. दादा देशमुख सभागृहामध्ये महाराष्ट्र केसरी पै. हर्षवर्धन सदगीर यांचे हस्ते सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिजामाता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. माणिकराव शेवाळे हे होते. यावेळी बेणके गुरुजी प्रतिष्ठान, पुणेचे अध्यक्ष सुनील बेणके, कळस चे सरपंच राजेंद्र गवांदे, रिपाई चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश शिरकांडे, सुभेदार मेजर जालिंदर जगताप, अगस्ती साखर कामगार पतसंस्थेचे माजी व्हा. चेअरमन ज्ञानेश्वर सहाणे, देवठाण सोसायटीचे चेअरमन जालिंदर बोडके आदी उपस्थित होते. ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष संपादक लहानु सदगीर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

      श्री. भाऊसाहेब वाकचौरे यांनी संजय गांधी निराधार शासकीय योजना समितीचे अध्यक्ष म्हणून गोर गरीब निराधार, दिव्यांग, महिला, आदिवासी, दलित यांना न्याय देण्याचे काम केले आहे.  ते कळस गावचे युवा सरपंच होते, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष,  जयकिसान दूध संस्थेचे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. भाजपा चे सोशल मीडिया सेल चे जिल्हा संयोजक असून अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा सरचिटणीस म्हणून काम करतात. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम करताना विध्यार्थी गुणगौरव सोहळा, शालेय साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करतात. त्यांना महाराष्ट्र शासनाचा सोशल मीडिया महामित्र पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते मिळाला आहे.

No comments