adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपड्यात महात्मा फुले अकॅडमी चा शुभारंभ... ज्ञानसंपदा वाढवणारी महात्मा फुले अभ्यासिका!

  चोपड्यात महात्मा फुले अकॅडमी चा शुभारंभ... ज्ञानसंपदा वाढवणारी महात्मा फुले अभ्यासिका! विकास पाटील धरणगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोप...

 चोपड्यात महात्मा फुले अकॅडमी चा शुभारंभ...

ज्ञानसंपदा वाढवणारी महात्मा फुले अभ्यासिका!



विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा : येथे स्पर्धा परीक्षा क्षेत्रात करिअर च्या वाटा शोधणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व मार्गदर्शन संदर्भात क्लास ची आजपासून सुरवात झाली.

             याबाबत सविस्तर माहिती अशी की, गौरव टी हाऊस चे संचालक गणेश विजय माळी यांनी स्पर्धा परीक्षांची (पोलीस भरती, सरळसेवा भरती, एमपीएससी) तयारी करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी हक्काचे ठिकाण त्याचप्रमाणे अभ्यासाचे सकारात्मक वातावरण निर्माण करण्याच्या हेतूने ३ महिन्यांपूर्वी चोपडा येथे "महात्मा फुले अभ्यासिका" सुरु केली. या अभ्यासिकेत विद्यार्थांचा वाढता प्रतिसाद व क्लास ची मागणी लक्षात घेता आजपासून "महात्मा फुले अकॅडमी" ह्या क्लासची सुरवात झाली. पहिल्याच दिवशी अकॅडमीच्या शुभारंभ सोहळ्यात विद्यार्थांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला, यामध्ये पोलीस भरती ची तयारी करणाऱ्या विद्यार्थी संख्या असंख्य होती. इथून पुढे ५ दिवस फ्री डेमो लेक्चर होणार असून ८ जून पासून रेग्युलर बॅचेस नुसार क्लास सुरु होईल. त्यात मराठी व्याकरण, अंकगणित व  बुद्धीमत्ता हे प्रमुख विषय शिकवले जातील. या विषयांसाठी ज्यांना स्पर्धा परीक्षा क्षेत्रात शिकवण्याचा १० वर्षांचा अनुभव असलेले अनुभवी शिक्षक लक्ष्मणराव पाटील व महेश चौधरी सर धरणगांव यांचे मार्गदर्शन लाभेल. ज्या विद्यार्थ्यांना क्लास मध्ये ऍडमिशन घ्यावयचा असेल त्यांनी नारायण वाडी, यशोधन प्लाझा चोपडा येथील महात्मा फुले अकॅडमी च्या ऑफिस मध्ये संपर्क साधावा. अशी माहिती संचालक गणेश विजय माळी यांनी दिली.

No comments