adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

खर्दे बु. येथील भिल्ल आदिवासी एकलव्य संघटनेचे तहसीलदारांना निवेदन दफनभूमीची जागा समाजाला द्या-- एकलव्य संघटनेच्या एल्गार

  खर्दे बु. येथील भिल्ल आदिवासी एकलव्य संघटनेचे तहसीलदारांना निवेदन दफनभूमीची जागा  समाजाला द्या-- एकलव्य संघटनेच्या एल्गार  जेसीबी लावून मृ...

 खर्दे बु. येथील भिल्ल आदिवासी एकलव्य संघटनेचे तहसीलदारांना निवेदन दफनभूमीची जागा  समाजाला द्या-- एकलव्य संघटनेच्या एल्गार 

जेसीबी लावून मृतदेहाची होतेय विटंबना---- बापू मोरे  


विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगाव : धरणगाव तालुक्यातील खर्दे बुद्रुक येथे आदिवासी भिल्ल समाजाचे दफनभूमीची कित्येक वर्षापासून जागा असून या जागेवर एका व्यक्तीने अनधिकृतपणे जेसीबी चालून पुरलेला प्रेतांची विटंबना होत असल्याचा आरोप खर्दे येथील ग्रामस्थांनी व भिल्ल आदिवासी एकलव्य समाजाच्या वतीने करण्यात आलेला आहे. सदरील जागा कित्येक वर्षापासून भिल्ल समाजाची दफनभूमी असून या दफनभूमीत अनधिकृत पणे कब्जा करून त्यात जेसीबी नेऊन प्रेतांची विटंबना होत असून भिल्ल समाजाच्या धार्मिक भावनांशी खेळले जात आहे. असा आरोप खर्दे बुद्रुक येथील ग्रामस्थांनी केला आहे. अशा आशयाचे निवेदन एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू मोरे व संघटनेचे विविध पदाधिकारी खर्दे बुद्रुक येथील भिल्ल समाजाच्या वतीने धरणगाव तालुका तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेले आहे. निवेदनाची दखल न घेतल्यास जिल्हाभर एकलव्य संघटना आंदोलन करेल असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू मोरे यांनी दिलेला आहे. या एकलव्य संघटनेच्या मागणी संदर्भात प्रशासन काय कार्यवाही करते याकडे सर्व जनतेचे लक्ष लागून आहे.

No comments