Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

माजी जि.प. सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे यांचा भाजपमध्ये प्रवेश

  माजी जि.प. सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे यांचा भाजपमध्ये प्रवेश भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल तालुका काग्रेस ...

 माजी जि.प. सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे यांचा भाजपमध्ये प्रवेश


भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल तालुका काग्रेस कमेटीचे २९ वर्ष अध्यक्ष असलेले माजी जिप  सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे , माजी जि प सदस्य आर. जी. पाटील , जिल्हा बँक संचालक विनोद पाटील सह पश्चिम भागातील असंख्य कार्यकत्यांनी आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुडे ,ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या उपस्थित भाजपात अधिकृत प्रवेश केला. 


 मुंबई येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,आ. अमोल जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाकर सोनवणे यांच्यासह तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे यावल तालुक्यात काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले आहे  आगामी निवडणुकांवर याचे परिणाम होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

प्रभाकर आप्पा सोनवणे  तालुक्यात प्रभावशाली नेतृत्व मानले जात असून त्यांचा भाजप प्रवेश हा तालुक्याच्या राजकीय समीकरणात मोठा बदल घडवणारा ठरू शकतो. त्यांच्या सोबत अनेक ग्रामपातळीवरील कार्यकर्ते, पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी भाजपमध्ये प्रवेश घेतल्याने भाजपची ताकद वाढणार आहे.

त्यामध्ये जिल्हा बँकेचे संचालक विनोद पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य आर. जी. पाटील, शेतकी संघाचे अमोल भिरूड, सरपंच संघटनेचे प्रमुख संदीप सोनवणे, रमजान तडवी, अनिल पाटील, पुंडलीक सावळे, आरती पाटील, मुबारक तडवी, योगेश कोळी, संदीप पाटील, मिनाक्षी पाटील, पाडळसा येथील कीरण तायडे, शेखर तायडे, सिताराम कोळी सह  लताताई पाटील, विनोद कोळी, प्रमोद सोनवणे बाळू शिंपी आणि प्रवीण सोनवणे यांच्या सह अनेक कार्यकर्त्यानी प्रवेश केला आहे

No comments