adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अंजाळे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न ५३६ लाभार्थ्यांना थेट सेवा

  अंजाळे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न ५३६ लाभार्थ्यांना थेट सेवा भरत कोळी यावल ता प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत ...

 अंजाळे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न ५३६ लाभार्थ्यांना थेट सेवा



भरत कोळी यावल ता प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल तालुक्यातील महसूल मंडळ अंजाळे अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचे आयोजन दिनांक ३ जून रोजी अंजाळे येथील जगन्नाथ महाराज मंदिरातील परिसरात करण्यात आले. या शिबिरात एकाच छताखाली विवीध शासकीय विभागांच्या सेवा उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. या उपक्रमातून एकूण ५३६ लाभार्थ्यांना थेट सेवा देण्यात आल्या. शिबिरात उपविभागीय अधिकारी बबन काकडे यांनी देखील सहभाग घेतला. त्यांनी सांगितले की, “शासनाच्या प्रत्येक यंत्रणेने पारदर्शकतेने सेवा पोहोचवली तरच वास्तविक अंत्योदय साध्य होईल.”

महसूल विभाग

जिवंत 7/12- 89

 ई हक्क नोंदणी -45

म.ज.म.अ. 155 दुरुस्ती -8

मतदार यादी अद्ययावतीकरण

नविन मतदार नोंदणी( form no. 6 ) -12

मयताचे नाव कमी करणे( form 7) -08

 मतदार यादीत नाव दुरुस्ती(form 8).  -2

संजय गांधी योजना DBT प्रक्रिया करणे लाभार्थी-183

आरोग्य तपासणी शिबिरचा लाभ-36

तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांचे मार्फत दिलेल्या सेवा-40

पुरवठा शाखा -शिधापत्रिका लाभ-15

सेतू केंद्रमार्फत दिलेले लाभ

उत्पन्न दाखले-23

जातीचे दाखले-18

वय अधिवास व रहिवास दाखले-2

जननी सुरक्षा योजना लाभ-22

लेक लाडकी योजना-2

ICDS योजना-8

अशाप्रकारे तालुक्यातील विविध मंडळांमध्ये शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत. तरी तालुक्यातील शेतकरी ग्रामस्थ यांनी लाभ घ्यावा असे तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी कळविले आहे

No comments