योग ही एक प्रभावशाली साधना आहे प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे श्रीरामपूर / प्रतिनिधी: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) योग हा व्यायामाचा एक असा प...
योग ही एक प्रभावशाली साधना आहे प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
योग हा व्यायामाचा एक असा प्रभावशाली प्रकार आहे की, ज्याच्या माध्यमातून केवळ शरीराच्या विविध अवयवांमधील नाही तर मनाचेही संतुलन राखले जाते म्हणून योग ही एक प्रभावशाली साधना आहे. योगाचाअंगीकार प्रत्येकाने केला पाहिजे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांनी केले .
तालुक्यातील बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित योग दिनाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर क्रीडा संचालक प्रा. डॉ. विनायक काळे ,योग प्रशिक्षिका प्रा. रुपाली उंडे हे होते.
प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे पुढे म्हणाल्या की, योगाभ्यासामुळे शारीरिक व्याधी बरोबरच मानसिक विकारांवर सुद्धा विजय मिळवता येऊ शकतो . आजच्या धकाधकीच्या काळात स्वस्थ, निरोगी, शांततापूर्ण आयुष्य जगण्यासाठी तसेच जीवनशैलीमध्ये मनशांती टिकून ठेवण्याचा सुरक्षित आणि सोपा मार्ग म्हणजे योग होय . त्यामुळे प्रत्येकाने नियमित योगा करणे गरजेचे आहे. यावेळी प्रा. डॉ. विनायक काळे, प्रा. रुपाली उंडे यांनी योग विषयक मार्गदर्शन करून योगासनांची प्रात्यक्षिके उपस्थितांकडून करुन घेतली. यावेळी प्रा. डॉ. बाबासाहेब पवार ,प्रा. विलास गायकवाड, प्रा. डॉ. अशोक माने ,प्रा.सतीश पावसे ,प्रा. सुनील विधाटे, प्रा. चंद्रकांत कोतकर, प्रा. डॉ. बाळासाहेब बाचकर, प्रा.डॉ. संजय नवाळे, प्रा. अशोक थोरात, प्रा. डॉ. विठ्ठल सदाफुले, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रा. डॉ. संजय नवाळे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. प्रकाश देशपांडे यांनी योग दिनासाठी उपस्थित असणाऱ्यांचे आभार मानले .
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments