अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन चोपडा येथील अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात उत्साहात साजरा चोपडा प्रतिनिधि रविंद्र कोळी (संपादक -:- ...
अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन चोपडा येथील अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात उत्साहात साजरा
चोपडा प्रतिनिधि रविंद्र कोळी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
२१ जून २०२५ "महात्मा गांधी शिक्षण मंडळ" संचलित श्रीमती शरच्चद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजिनिअरिंग & पॉलिटेक्निक) ,चोपडा. येथे अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात आणि उत्सवमूर्त वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात योगाभ्यास सत्राने झाली, ज्यात विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. महाविद्यालयीन
योग प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासनं, प्राणायाम आणि ध्यानधारणा याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या प्रसंगी त्यांनी योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारे फायदे स्पष्ट केले आणि दररोज योगसाधनेचे महत्त्व अधोरेखित केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य श्री व्ही एन बोरसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "योग हा भारताचा अमूल्य वारसा आहे. तंत्रज्ञान आणि शिक्षणाच्या जोडीने जर आपण आरोग्याकडेही लक्ष दिलं, तर एक सशक्त आणि संतुलित समाज उभा राहू शकतो."
कार्यक्रमाचा समारोप सामूहिक ध्यान आणि ‘योग दिन’ या संकल्पनेमागील उद्दिष्टांची आठवण करून देत करण्यात आला.

No comments