सावदा - रावेर महामार्गावर अपघात ट्रकची दुचाकीला धडक एकाचा जागीच मृत्यू तर एक जखमी रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवा...
सावदा - रावेर महामार्गावर अपघात ट्रकची दुचाकीला धडक एकाचा जागीच मृत्यू तर एक जखमी
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अंकलेश्वर बुऱ्हानपूर महामार्गावरील सावदा ते रावेर रस्त्यावरील हॉटेल कुंदन जवळ आज सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास रखने दुचाकीला जबर धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात हर्षल नारायण सरोदे (वय ४५, रा. मस्कावद सिम, ता. रावेर, जि. जळगाव यांचा जागीच मृत्यू झाला तर हर्षल बाजीराव पाटील वय ४३, रा. मस्कावद सिम, ता. रावेर, जि. जळगाव यांना गंभीर दुखापत होऊन जखमी झाले
सविस्तर असे की अंकलेश्वर बुऱ्हानपूर महामार्गावरील सावदा ते मोठे वाघोदा दरम्यानच्या हॉटेल कुंदन जवळ टाटा ट्रक क्र.PB-65-BB-
9182 चालक सतविंदरसिंग अमरजितसिंग (वय ३७, रा. अवानकोट, रुपनगर, रोपड, पंजाब) याने बेदरकारपणे आणि भरधाव वेगाने ट्रक चालवून हर्षल यांच्या मोटरसायकलला सीडी डॉन हिरोहोंडा, क्र.MH-19-AD-
0185 ला मागून जोरदार धडक दिली या अपघाताची सावदा पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी हर्षल बाजीराव पाटील (वय ४३, रा. मस्कावाद सिम, ता. रावेर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र
हर्षल नारायण सरोदे हे सावद्याहून मस्कावदसिम गावाकडे मोटरसायकलवरून जात असताना हा अपघात घडला. टाटा ट्रकचालकाने ट्रक चालवतांना रस्त्याच्या
परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे गाडी चालवल्याने यांच्या दुचाकीला जबर धडक दिली धडक दिल्याने हर्षल सरोदे यांचा जागीच मृत्यू झाला. यात फिर्यादी हर्षल पाटील यांनाही दुखापत झाली.असून मोटरसायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
. या प्रकरणी सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ०१६५/२०२५ अंतर्गत भा. द. वि. संहिता कलम १०६ (१), २८१, १२५ (A), १२५ (B) आणि मोटर वाहन कायदा कलम १८४ अन्वये आरोपी ट्रकचालक सतविंदरसिंग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी
सावदा पोलीस स्टेशनचे प्रभारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पुंडलिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे कॉन्स्टेबल उमेश पाटील,पो कॉ विजय पोहेकर यांनी अपघात स्थळाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सावदा पोलीस स्टेशनचे साहेब पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहे

No comments