सावदा पालिकेकडून ८ दिवसांपासून चिखलमय मार्गांवर मुरुम टाकण्याचे काम सुरू! रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रावेर ...
सावदा पालिकेकडून ८ दिवसांपासून चिखलमय मार्गांवर मुरुम टाकण्याचे काम सुरू!
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील सावदा नगरपालिका हद्दीत तसेच शहराच्या चारी बाजूंने नविन प्लॉट एरिया मध्ये कमालीची वाढ झालेली असून, यानिमित्ताने संपूर्ण शहरात अमृत २.० योजने अंतर्गत पाण्याची पाइपलाइन टाकण्यासाठी जोमाने खोदकाम सुरू होता.तरी यादरम्यान पाऊसाची सुरुवात झाली असता रस्त्यांवर खोदलेल्या पाइपलाइनच्या चाऱ्या पाऊस पडल्याने चिखलमय झाल्याने दुचाकी, चारचाकी वाहनांसह रहिवासी नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे.
तरी गेल्या आठवड्यात शहरातील चिखलमय समस्याग्रस्त भागातील लोकांच्या वतीने सदरील गंभीर प्रकार माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे सह महिला अन्याय अत्याचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य चे पदाधिकारी फरीद शेख व युसूफ शाह यांनी मुख्याधिकारी भुषण वर्मा यांना भेटून निदर्शनास आणून देत.तात्काळ अशा ठिकाणी मुरुम टाकून योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली असता,याची त्वरित दखल घेऊन शहरात नविन विस्तारित समस्याग्रस्त भागांमध्ये १८ जून २०२५ पासून टप्पा टप्याने पालिकेकडून मुरुम टाकण्याचे काम जलदगतीने सतत सुरू आहे.
शहराचा विस्तार कमालीचा वाढलेला असून,पाइपलाईन खोदकामात पालिका हद्दीत ज्या ज्या ठिकाणी मातीच्या थरामुळे रस्त्यांवर चिखल साचला आहे.अशा भागातील मार्गांवर सतत आठ दिवसांपासून टप्या टप्याने मुरुम टाकण्याचे काम सुरू असून,उर्वरित भागांची पाहणी पालिकेचे संबंधित कर्मचारी करीत असून,कोणताही भाग सुटणार नाही.सर्व जागांवर मुरुम टाकले जाईल.आणि चिखलमय वातावरण नाहीसे करण्याचा प्रयत्न सुरूच राहील.शहर विस्तारात वाढ झाली असून थोडाफार विलंब होत असेल.तरी याचा विचार नागरिकांनी करून सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी भुषण वर्मा यांनी केले आहे.
तसेच माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनी सदर उद्भवलेली गंभीर समस्या बाबत.व ठेकेदाराच्या कामांवर प्रश्न चिन्ह उभा केल्या संदर्भात माध्यमांनी प्रश्न विचारले असता.लक्ष्मी कंट्रक्शन कंपनी तथा ठेकेदार यांनी वेळेवर काम पूर्ण न केल्यास चिखलमय मार्गांवर टाकण्यात येणारे मुरुमचा खर्च संबंधित ठेकेदाराच्या देयकातून वसूल केली जाईल.अशी माहिती मुख्याधिकारी भुषण वर्मा यांनी दिली आहे.

No comments