वरुड - महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त "मॅरेथॉन रन फॉर सेफ्टी" कार्यक्रम संपन्न विद्युत सुरक्षा जनजागृतीसाठी महावितरण अधिकारी -...
वरुड - महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त "मॅरेथॉन रन फॉर सेफ्टी" कार्यक्रम संपन्न
विद्युत सुरक्षा जनजागृतीसाठी महावितरण अधिकारी - कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
वरुड (जि.अमरावती) प्रतिनिधी:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महावितरण कंपनीच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक १ जून ते ६ जून २०२५ या कालावधीत वर्धापन दिन व विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून वरुड (जि.अमरावती) शहरात दिनांक १ जून २०२५ रोजी "मॅरेथॉन रन फॉर सेफ्टी" या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे "शून्य अपघात महावितरण, शून्य अपघात महाराष्ट्र" हे ध्येय गाठणे तसेच विद्युत सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण करणे असे होते.
मॅरेथॉन स्पर्धेस महावितरणचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांच्या सहभागातून सुरक्षिततेच्या महत्वाबाबत जनमानसात सकारात्मक संदेश पोहोचविण्यात यश आले. मॅरेथॉन स्पर्धेनंतर वरुड शहरातील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रवीण चौधरी तसेच नामांकित हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जयस्वाल यांनी विद्युत अपघातानंतर दिल्या जाणाऱ्या सीपीआर म्हणजेच हृदयक्रिया पुन्हा सुरू करण्याच्या प्राथमिक उपचार प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी सीपीआर चे महत्त्व, ती देताना घ्यावयाची काळजी आणि योग्य पद्धती याविषयी सविस्तर माहिती दिली आणि प्रात्यक्षिकाद्वारे उपस्थितांना प्रशिक्षण दिले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोर्शी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.विजयकुमार कासट यांचे तसेच वरुड उपविभाग क्रमांक १ चे उपकार्यकारी अभियंता श्री. अभिजीत फरकाडे, वरुड उपविभाग क्रमांक २ चे उपकार्यकारी अभियंता श्री. प्रवीण देशमुख, व शेघाट उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. अमोल इंगळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे पार पाडण्यासाठी सहाय्यक अभियंता तथा सुरक्षा अधिकारी श्री. स्वप्निल हेटे व कनिष्ठ अभियंता श्री. गणेश जाधव यांनी विशेष मेहनत घेतली. हा उपक्रम महावितरणच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरला असून, अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्युत सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढवण्यास निश्चितच हातभार लागणार आहे.
वृत्त विशेष सहयोग
पत्रकार प्रविण सावरकर
वरुड (जि.अमरावती)
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
No comments