चौगाव येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० वी जयंतीनिमित्त चौगाव गावात "दिपप्रकाश अकॅडमी आणि कोचिंग सेंटर चे उदघाटन चोपडा प्...
चौगाव येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० वी जयंतीनिमित्त चौगाव गावात "दिपप्रकाश अकॅडमी आणि कोचिंग सेंटर चे उदघाटन
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील चौगाव येथे अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० वी जयंतीनिमित्त चौगाव गावात "दिपप्रकाश अकॅडमी आणि कोचिंग सेंटर चे उदघाटन मोठया उत्साहत पार पडला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे कला शास्त्र वाणिज्य महाविद्यालयाचे (एच एम ओ डी)दिलीप पं.सपकाळे यांच्या हस्ते फित कापण्यात आली
कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच कल्पना पारधी,उपसरपंच गोपाळ पाटील,गावचे पोलिस पाटील गोरख पाटील तसेच गावातील पुष्पाताई योगराज राजपुत,सुनिल धनगर,अकॅडमी च्या संचालिका दिपमाला धनगर आणि विद्यार्थी हे सर्व हजर होते.प्रथम सावित्रीबाईफुले आणि अहिल्याबाईहोळकर यांच्या फोटोला हार वाहुन मानवंदना देण्यात आली प्रमुख पाहुणयांचे भाषणा नंतर संचालिकांचे दोन शब्द बोलुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
No comments