adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

उजव्या हातात तलवार तर डाव्या हातात कोयता घेवुन दहशत निर्माण करणाऱ्यास एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

 उजव्या हातात तलवार तर डाव्या हातात कोयता घेवुन दहशत निर्माण करणाऱ्यास एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक-:- हे...

 उजव्या हातात तलवार तर डाव्या हातात कोयता घेवुन दहशत निर्माण करणाऱ्यास एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या



सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि१६):-एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत विनापरवाना अवैधरित्या धारधार तलवार व कोयता घेवुन फिरणा-या आरोपीस पकडण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे.बातमीची हकीकत आशिकी,दि.१६ जून २०२५ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे  सपोनि.माणिक चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,एक इसम दोन्ही हातात लोखंडी धारधार कोयता व तलवार घेवुन दहशत करुन फिरत आहे.अशी बातमी मिळाल्याने सपोनि.चौधरी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तयार करुन सदर इसमावर कारवाई करण्यास सांगीतले.पथकाने सदर इसमास जागीच पकडुन त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अनिश बाळु पवार (वय-२४ वर्ष रा.गजानन कॉलनी नवनागापुर ता.जि.अहिल्यानगर) असे सांगीतले.त्याला त्याच्या अंगझडतीचा उददेश समजावुन सांगुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात धारधार एक लोखंडी तलवार व कोयता मिळुन आले सदर तलवार व कोयता त्याचेकडुन जप्त करण्यात आले असुन सदर इसमाविरुदध एमआयडीसी पोस्टेला गु रजि नंबर ७५५/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरचा आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत.सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री. अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांच्या मार्गदर्शानाखाली सपोनि.माणिक बी.चौधरी प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन,पोहेकॉ.राजु सुद्रिक,पोना. विष्णु भागवत,पोना.पालवे,पोकॉ. किशोर जाधव,पोकॉ.नवनाथ दहिफळे यांच्या पथकाने केली आहे.

No comments