adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान महा.राज्य शिरपूर, महाराष्ट्र नाभिक महामंडळ शिरपूर तसेच ऑल इंडिया सैनजी महासंघ ट्रस्ट नई दिल्ली, धुळे यांच्यातर्फे आव्हान

  शिरपूर शहरात लवकरच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच विविध क्षेत्रातील सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सामूहिक सत्कार सोहळ्याचे आयोजन  ...

 शिरपूर शहरात लवकरच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच विविध क्षेत्रातील सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सामूहिक सत्कार सोहळ्याचे आयोजन 

जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान महा.राज्य शिरपूर, महाराष्ट्र नाभिक महामंडळ शिरपूर तसेच ऑल इंडिया सैनजी महासंघ ट्रस्ट नई दिल्ली, धुळे यांच्यातर्फे आव्हान 



 शिरपूर प्रतिनिधी

(संपादक हेमकांत गायकवाड)

शिरपूर शहरात लवकरच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच विविध क्षेत्रातील सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सामूहिक सत्कार सोहळा, जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान महा.राज्य शिरपूर, महाराष्ट्र नाभिक महामंडळ शिरपूर तसेच ऑल इंडिया सैनजी महासंघ ट्रस्ट नई दिल्ली, धुळे   यांच्यातर्फे लवकरच संपन्न होणार असून 

शिरपूर शहरातील सर्व नाभिक समाज बांधवांना सुचित करण्यात येते की, शिरपूर येथील जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान महा. राज्य शिरपूर , महाराष्ट्र नाभिक महामंडळ शिरपूर तसेच ऑल इंडिया सैनजी महासंघ ट्रस्ट नई दिल्ली धुळे यांच्यातर्फे लवकरच शहरासह संपूर्ण तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच विविध क्षेत्रातील निवृत्त झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सामुदायिक सत्कार सोहळा आयोजित करण्याचे ठरवले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपण शिकत असलेल्या इयत्तेत उत्कृष्ट गुण प्राप्त केलेले असतिल अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा वरील तीनही संघटनांच्या मार्फत गौरविण्यात येणार असून बक्षीस ही प्रदान करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे निवृत्त कर्मचारी बांधवांचा देखील सामूहिक सत्कार करण्यात येईल. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मानाची विनंती की, सदर कार्यक्रमाची आठ दिवसात तारीख जाहीर झाल्यानंतर आपण आपल्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रक आपणाला कळविलेल्या ठिकाणी जमा करुन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मदत करावी. तसेच तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावीत जास्तीत जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांमधून प्रथम तीन विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात बक्षीस, सन्मानचिन्ह तसेच प्रमाणपत्र महाराष्ट्र नाभिक महामंडळ धुळे जिल्हा उपाध्यक्ष श्री.रामचंद्र येशी यांच्या कडून देण्यात येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे आपल्या संबंधित शहरातील तसेच तालुक्यातील नातेवाईक किंवा समाज बांधव वेगवेगळ्या क्षेत्रातून निवृत्त झाले असतील त्यांची देखील नावे आम्हाला कळवावीत जेणेकरून आम्हाला आपले समाज बांधव माहीत होतील व त्यांचा सत्कार आमच्या तिन्ही संघटनेच्या वतीने होतील व तालुक्यातील कोणते ही निवृत्त समाज बांधव हया कार्यक्रमापासून वंचित राहणार नाही ही आपणास आग्रहाची नम्र विनंती. सदर कार्यक्रमाची दिनांक लवकरच येत्या काही दिवसात ग्रुप वर जाहीर होणार आहे तरी सर्व समाज बांधवांनी याची दखल घ्यावी ही पुनश्च नम्र विनंती

आयोजक

जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान महा. राज्य शिरपूर

महाराष्ट्र नाभिक महामंडळ शिरपूर

ऑल इंडिया सैनजी महासंघ ट्रस्ट नई दिल्ली धुळे

No comments