विरावली येथे कृषिकन्या यांनी साजरा केले आंतरराष्ट्रीय योगा दिवस भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) दि.२१ जून रोजी विरव...
विरावली येथे कृषिकन्या यांनी साजरा केले आंतरराष्ट्रीय योगा दिवस
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
दि.२१ जून रोजी विरवली ता.यावल येथे आलेल्या डॉ उल्हास पाटील कृषि महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या कृषिकन्या यांनी जिल्हा परिषद शाळेत योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व, फायदे आणि त्याचा दैनंदिन जीवनातील उपयोग याविषयी माहिती देण्यात आली. विविध योगासने प्रत्यक्ष करून दाखवण्यात आली आणि विद्यार्थ्यांना देखील सहभाग घेण्यास प्रोत्साहित करण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजक कृषिकन्या धनश्वेता अहिरे, प्रज्ञा गजरे, ऐश्वर्या सोनवणे, सृष्टी डोंगरे, प्रतीक्षा गावित, विशाखा सोनावणे, यांनी केले. यावेळी शाळेत शि. वि.अ श्रीमती मंगला बाबुलाल सपकाळे व शाळेच्या मुख्याध्यापिका योगेश्वरी धनगर, शिक्षकवृंद प्रियंका तायडे, सुवर्णा पाटील, नम्रता पाटील सोबतच अंगणवाडी शिक्षिका भावना पाटील तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments