adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

तेजसच्या खुनाची सखोल चौकशी करण्याची नातेवाईकांची मागणी.

  तेजसच्या खुनाची सखोल चौकशी करण्याची नातेवाईकांची मागणी. एरंडोल प्रतिनिधी सुधीर महाले  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) एरंडोल- तालुक्यातील रिं...

 तेजसच्या खुनाची सखोल चौकशी करण्याची नातेवाईकांची मागणी.

एरंडोल प्रतिनिधी सुधीर महाले 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

एरंडोल- तालुक्यातील रिंगणगाव येथील चौदा वर्षीय तेजस गजानन महाजन याची करण्यात आलेली हत्या नरबळीचाच प्रकार असून हत्येची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी तेजसचे वडील गजानन महाजन,काका किरण महाजन यांचेसह परिवारातील सदस्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.दरम्यान रिंगणगाव येथे तणावपर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.रिंगणगाव येथील चौदा वर्षीय तेजस महाजन याच्या हत्येने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चा सुरु आहेत.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हत्येतील दोन आरोपींना अटक केली असून प्रमुख संशयित आरोपी फरार आहे.हत्येच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून हत्येबाबत पोलिसांना खोटी माहिती दिली जात असून तेजसची हत्या नरबळीचाच प्रकार असून याची सखोल चौकशी केल्यावर पूर्ण सत्य बाहेर येईल.तेजसची हत्या अत्यंत सुनियोजितपणे तसेच क्रूरपणे करण्यात आली असून आरोपी खोटे बोलून दिशाभूल करीत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.तेजसची गळा चिरून हत्या करण्यात आली असून त्याचा कंठ काढण्यात आल्याचा आरोप वडील गजानन महाजन यांनी केला आहे.पोलिसांनी अटक केलेले आरोपी धक्का लागल्याच्या कारणावरून वादविवाद झाल्यामुळे तेजसचा खून केल्याचे सांगत असले तरी भर बाजारात वाद कसा होईल ?ग्रामस्थांना झालेल्या वादाची माहिती कशी कळाली नाही ?आरोपी कोणाला कसे दिसले नाही ? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.तेजसच्या हत्येची सखोल चौकशी करून न्याय देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.तेजसच्या हत्येची गुप्तचर खात्यामार्फत चौकशी करण्यात यावी,खटल्यांसाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नेमणूक करण्याची मागणी करण्यात आली.यावेळी तेजसचे काका किरण महाजन,जिल्हापरिषदेचे माजी सदस्य नाना महाजन,माजी सरपंच गजानन महाजन,मेघराज महाजन यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.

No comments