शहरातील दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा खेळायला प्रतिष्ठित व्यक्तींचा सहभाग सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्...
शहरातील दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा खेळायला प्रतिष्ठित व्यक्तींचा सहभाग
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि२०):-शहरात दोन अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून धाड टाकून एकूण ९,१७,५५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलिसांनी २९ आरोपींना ताब्यात घेतले आहेत.त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४ व ५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय जागा व साहित्य उपलब्ध करून देणाऱ्या दोन इसमांविरुद्धही कारवाई करण्यात आली आहे.पहिली कारवाई अमरधामजवळील लोखंडी पुलाखालील पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात आली.येथे १२ आरोपी तिरट नावाचा जुगार खेळताना आढळले.दुसरी कारवाई एका हॉटेलच्या मागील पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात आली.येथे १७ आरोपी मिळून आले.ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार पोलिस उपअधीक्षक (परिविक्षाधीन) संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोहेकॉ.शंकर चौधरी,अरविंद भिंगारदिवे,अजय साठे, मल्लीकार्जुन बनकर,दिनेश मोरे, दिगंबर कारखिले,उमेश खेडकर, पोकॉ.सुनिल दिघे,अमोल कांबळे,संभाजी बोराडे,जालिंदर दहिफळे यांनी केली.

No comments