adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

डोंगरकोठार शिवारात बिबट्याच्या पिल्लाचा मृतदेह आढळला

  डोंगरकोठार शिवारात बिबट्याच्या पिल्लाचा मृतदेह आढळला भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल तालुक्यातील डोंगरकोठार ...

 डोंगरकोठार शिवारात बिबट्याच्या पिल्लाचा मृतदेह आढळला


भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल तालुक्यातील डोंगरकोठार शिवारात रविवारी (22 जून) एका बिबट्याच्या पिल्लाचा मृतदेह केळीच्या बागेत आढळून आला. काही दिवसांपासून या परिसरात मादी बिबट्या व तिची दोन पिल्ले फिरताना शेतकऱ्यांना दिसून येत होती. त्यापैकी सुरीमुळे साडेतीन महिन्यांच्या एका पिल्लाचा मृतदेह ग्रामपंचायतीच्या गायरानातील केळीच्या बागेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही माहिती मिळताच वन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या मृत बिबट्या पिल्ल्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार हे पिल्लू नैसर्गिक मृत्यूने मरण पावले असावे, मात्र नेमके कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे.

डोंगरकोठार परिसरात यापूर्वीपासून बिबट्याचा वावर असून, शेतकऱ्यांनी मादी बिबट्या आणि तिची पिल्ले शेतात फिरताना पाहिल्याचे वन विभागाला माहिती दिली होती. रविवारी संध्याकाळी केळीच्या बागेत पिल्लाचा मृतदेह आढळून आल्यानंतर शेतकऱ्यांनी याबाबत यावल वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे, वनपाल तडवी आणि पथकाला कळवले. त्यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृत पिल्लू ताब्यात घेतले.

या घटनेने परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने पिल्लाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू केला आहे.

No comments