adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कत्तलीच्या उद्देशाने गोवंश नेत असलेल्या दोघांविरुद्ध यावल पोलिसांनी कारवाई अंदाजे ३० हजार रुपये किमतीचे दोन गोवंश ताब्यात

  कत्तलीच्या उद्देशाने गोवंश नेत असलेल्या दोघांविरुद्ध यावल पोलिसांनी कारवाई अंदाजे ३० हजार रुपये किमतीचे दोन गोवंश ताब्यात  काल्पनिक फाईल च...

 कत्तलीच्या उद्देशाने गोवंश नेत असलेल्या दोघांविरुद्ध यावल पोलिसांनी कारवाई

अंदाजे ३० हजार रुपये किमतीचे दोन गोवंश ताब्यात 

काल्पनिक फाईल चित्र 

भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल तालुक्यातील कोळवद येथून कोरपावलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कत्तलीच्या उद्देशाने गोवंश नेत असलेल्या दोघांविरुद्ध यावल पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला असून अंदाजे ३० हजार रुपये किमतीचे दोन गोवंश ताब्यात घेण्यात आले आहेत.

कोळवद गावातून कोरपावलीकडे जाणाऱ्या मार्गावर मुझफ्फर खान साबीर खान व हुमीद जुम्मा तडवी हे दोघे कतलीच्या हेतूने गोवंश घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तातडीने कारवाई करत दोघांकडील गोवंश ताब्यात घेण्यात आले व गोशाळेत सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विजय पाचपोळे करत असून, पोलिसांनी अशा प्रकारच्या प्रकरणांवर लक्ष ठेवून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

No comments