मोठा वाघोद्यातील जीर्ण जलकुंभ देतोय मृत्यूचे निमंत्रण ग्रामपंचायत प्रशासन बेफिकीर? रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायक...
मोठा वाघोद्यातील जीर्ण जलकुंभ देतोय मृत्यूचे निमंत्रण
ग्रामपंचायत प्रशासन बेफिकीर?
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बु येथील ग्रामपंचायत च्या जीर्ण झालेल्या जलकुंभाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे जलकुंभ अतिशय जीर्ण झाला आहे जलकुंभावरील छताचे ढेकळी पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे विशेष जलकुंभ कधी कोसळेल ढासळेल आणि प्राणहानी जीवीतहानी होईल हे सांगताच येत नाही आणि हा जलकुंभ मोठा वाघोदा येथील बसस्थानक परिसरात असून अतिशय वर्दळीच्या ठिकाणी आहे व जलकुंभाखालीच 10 व्यावसायिक दुकान गाळे असलेला व्यापारी संकुल , पान टपरी आहे आणि याच व्यापारी संकुलात व्यावसायिकांच्या दुकानात नेहमीच ग्राहकांची गर्दी व सतत नागरिकांची वर्दळ असते कदाचित अचानक हा जलकुंभ ढासळला तर मोठ्या प्रमाणात जीवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही या जीर्ण जलकुंभाबाबत ग्रामपंचायत कडे ग्रामसभेत गावकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत यासोबतच अनेक दैनिक वृत्तपत्रात बातम्या छापून आल्या आहेत या बाबतीत वर्षभरापासून वृत्तपत्रांमधून वृत्त प्रकाशित झाल्यावर ग्रामपंचायत प्रशासनाने जलकुंभ पाडण्यासाठी ठराव मंजूर केला
जलकुंभाजवळील परिसरात वापरण्यासाठी बंदी ची नोटीस लावण्यात आली मात्र नक्की घोडे अडले कुठे? म्हणूनच तर अद्यापही हा जलकुंभ पाडण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला मुहूर्त सापडलेला नाही व काहीही सोयरसुतक नसल्याचे स्पष्ट चित्र सध्यातरी दिसत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत आणि याच पावसाळ्यात हा अतिशय जीर्ण जलकुंभ कोसळण्याची दाट शक्यता आहे व ती नाकारता ही येणार नाही तरीही ग्रामपंचायत प्रशासन निष्क्रिय तसेच निश्चिंत बेफिकीर परिस्थितीत "नो टेन्शन दिसते? ग्रामपंचायत प्रशासन या जलकुंभाची पाण्याऐवजी आपोआप कोसळण्याची वाट बघतेय का? तसेच जलकुंभाची पडझड अथवा ढासळून जीवीतहानी होण्याची वाट बघतेय का ? म्हणून या जीर्ण जलकुंभामुळे वाईट अप्रिय घटना घडू नये याकरिता तातडीने जलकुंभ पाडण्यासाठी जमीनदोस्त करण्याची तसदी ग्रामपंचायत प्रशासन घेईल का? नुकतेच रावेर पंचायत समिती त अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या गटविकास अधिकारी पदावर रुजू झालेले कार्यतत्पर कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी तसेच शिस्तबद्ध शिस्तप्रिय कर्तव्यदक्ष मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी या जीर्ण जलकुंभाबाबत तातडीने दखल घेऊन उपाययोजना करावी अशी मागणी मोठा वासियांतर्फे करण्यात आली आहे


No comments