पी एम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रथम दिनी विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव साजरा भ...
पी एम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रथम दिनी विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव साजरा
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल नगर परिषद संचलित पी एम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल या ठिकाणी नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रथम दिनी विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला. यावल नगर परिषदेचे मुख्याधिकारी साहेब माननीय निशिकांत गवई साहेब यांच्या निर्देशानुसार विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी सर्वप्रथम इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे ढोल ताशे बँड च्या गजरात हार्दिक स्वागत करण्यात आले. यानंतर आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश, बूट, पायमोजे, मोफत शालेय पुस्तके, शंभर पेजेस सहा वह्या व गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यावल नगरपरिषद कार्यालयीन अधीक्षक श्री कोल्हे साहेब, मयूर जगताप सर व नगरपालिकेचे इतर कर्मचारी श्री रवी काटकर,बांधकाम अभियंता संग्राम साहेब, अभियंता शेख साहेब, फालक मॅडम, श्री नन्नवरे व इतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यालयाचे अधिकारी वर्ग मुख्याध्यापक श्री एम के पाटील सर, उपप्राचार्य श्री इंगळे सर,पर्यवेक्षक श्री काटकर सर, नन्नवरे सर,जेष्ठ शिक्षक पी एन सोनवणे सर, श्री एन डी नेवे सर मुख्यालिपीक श्री नितीन बारी भाऊसाहेब, प्रसिद्ध ठेकेदार श्री आर डी पाटील सर व्यासपीठावर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचं शाल व पुष्पगुच्छदेऊन सत्कार करण्यात आला.व्यासपीठावर समाजसेविका शशिकलाताई त्रंबक चौधरी यांनी विद्यार्थ्यांना वह्या दिल्यात. समाजसेविका कमलताई रेवा पाटील उपस्थित होत्या. श्री बि डी राणे सर यांच्याकडून विद्यार्थ्यांना पेन वाटप केले गेले. विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होता.विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments