LCB च्या पथकाचे जिल्ह्यातील अवैध कत्तलखान्यावर छापे,15 आरोपींवर गुन्हे दाखल सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानग...
LCB च्या पथकाचे जिल्ह्यातील अवैध कत्तलखान्यावर छापे,15 आरोपींवर गुन्हे दाखल
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.९):- जिल्ह्यात 5अवैध कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकत 7 लाख 65,400/- रू.किं.त्यात 300 किलो गोमांससह 17 गोवंशीय जनावरे ताब्यात घेण्याची कारवाई केली आहे. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीवरून भिंगार कॅम्प, सोनई,लोणी,नेवासा व कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत कत्तल करण्याचे उद्देशाने गोवंशीय जनावरे निदर्यतेने डांबुन ठेवलेबाबत मिळालेल्या माहितीवरून पंचासमक्ष छापे टाकुन कारवाई केली.
केलेल्या कारवाईमध्ये 15 आरोपी विरूध्द 05 गुन्हे दाखल करण्यात आले. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे, श्री.वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/तुषार धाकराव, पोसई/अनंत सालगुडे, पोसई/राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार संदीप पवार, गणेश धोत्रे, शाहीद शेख, बिरप्पा करमल, शिवाजी ढाकणे, जालींदर माने, ज्ञानेश्वर शिंदे, अशोक लिपणे, बाळासाहेब नागरगोजे, संदीप दरंदले, किशोर शिरसाठ, उमाकांत गावडे, गणेश लोंढे,संतोष लोढे,अतुल लोटके, बाळासाहेब गुंजाळ, रोहित येमुल, मनोज लातुरकर,रणजीत जाधव, अमृत आढाव, रमीजराजा आत्तार, हृदय घोडके, महादेव भांड, अरूण गांगुर्डे, भगवान थोरात,अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, सुनिल मालणकर, अरूण मोरे यांनी केलेली आहे.



No comments