फैजपूरात पाण्यासाठी संतप्त महिला व नागरीकांचा नगरपालिकेवर मोर्चा प्रांतअधिकारी यांना निवेदन सादर इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गा...
फैजपूरात पाण्यासाठी संतप्त महिला व नागरीकांचा नगरपालिकेवर मोर्चा
प्रांतअधिकारी यांना निवेदन सादर
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत प्रांताधिकारी उपविभाग फैजपूर यांना संतप्त महिला व न्यु लिमरा फाउंडेशनचे अध्यक्ष वसीम जनाब व न्यु खिदमते मिल्लत फाउंडेशनचे अध्यक्ष मुदस्सर नज़र यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला व निवेदन दिले शहरातील पाणी पुरवठा नियोजन कोलमडले आहे कधीही पिण्याचे पाणी वेळेवर मिळत नाही मिल्लत नगर , पठाण वाडी हजीरा मोहल्ला येथील रहिवासी ईद सणाच्या दिवशी सुद्धा पिण्याचे पाणी साठी ताटकळत बसलेले होते वारंवार निवेदने देऊन सुद्धा पिण्याचे पाणी वेळेवर होत नाही म्हणून आता नागरिकांची सहनशीलता समाप्त होण्याच्या मार्गावर आहेत पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास आम्ही सर्व नागरिक व महीला १६ जुन २०२५ पासून नगरपालिके समोर साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहे व हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देत आहेत कृपया करून आपण याकडे लक्ष द्यावे अशी विनंती केली आहे यावेळी फैजपूर शहरांतील मिल्लत नगर, हजीरा मोहल्ला, पठाण वाडी भागातील महिला उपस्थित होत्या संतप्त नागरिकांनी बंद मुख्याधिकारी कार्यालयावर फुलांचा हार घातला.
फैजपूर शहरात नगरपालिकेत कित्येक वर्षांपासून मुख्याधिकारी नाही प्रभारी मुख्याधिकारी नगरपालिकेचा गाडा हाकलत आहे शहरांचे विकास व पाणी पुरवठा साफसफाईचे नियोजन कोलमडले आहे नागरिकांनी निवेदने देऊन काही काम होत नाही म्हणून आज संतप्त महिलांनी न्यु खिदमते मिल्लत फाउंडेशनचे अध्यक्ष मुदस्सर नज़र व लिमरा फाउंडेशनचे अध्यक्ष वसीम जनाब यांना घेऊन नगरपालिकेत मोर्चा काढला व मुख्याधिकारी कार्यालयावर फुलांचा हार घातला व प्रशासन जागे व्हावे यासाठी नारेबाजी केली यावेळी पठाण वाडी,हजीरा मोहल्ला,मिल्लत नगर, येथील महिला उपस्थित होत्या.


No comments