adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कोतवाली पोलीस ठाण्यातील जप्त व बेवारस १२७ दुचाकींची 1 जुलै रोजी लिलाव प्रक्रिया पडली पार

  कोतवाली पोलीस ठाण्यातील  जप्त व बेवारस १२७ दुचाकींची 1 जुलै रोजी लिलाव प्रक्रिया पडली पार  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकव...

 कोतवाली पोलीस ठाण्यातील  जप्त व बेवारस १२७ दुचाकींची 1 जुलै रोजी लिलाव प्रक्रिया पडली पार 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.३):- कोतवाली पोलीस स्टेशन येथील  आवारात गेल्या अनेक वर्षांपासून पडून असलेल्या एकूण १२७ दुचाकींची लिलाव प्रक्रिया दि.१ जुलै रोजी पार पडली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० कलमी कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत अभिलेखावरील जप्त व बेवारस दुचाकी लिलाव करण्याची कायदेशीर पूर्तता झाल्यानंतर दि. १ जुलै रोजी कोतवाली पोलीस ठाणे अंतर्गत येणा-या केडगाव पोलीस चौकी आवारात सपोनि. कुणाल सपकाळे,पोहेकॉ. वाघमारे,पोहेकॉ.डाके,पोहेकॉ. लगड,पोहेकॉ.गाजरे,पोहेकॉ. शिंदे,मपोकॉ.सोनाली भागवत यांच्या उपस्थितीत दोन पंचांसमक्ष लिलाव पार पडला. यावेळी लिलावात भाग घेतलेल्या चारपैकी नगर येथील शेख राजिक युनूस यांनी चढ्या बोलीने सदर दुचाकी वाहनांचा लिलाव घेतल्याने सदर लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली. अर्जदाराने दिलेली रक्कम सरकार जमा करण्यात आली आहे.सदरची प्रक्रिया पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे व कर्मचाऱ्यांनी पार पाडली.

No comments