adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अमळनेर तालुक्यातील युरियाची टंचाई संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन.

  अमळनेर तालुक्यातील युरियाची टंचाई संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन.      अमळनेर प्रतिनिधी (संपादक हेमकांत गायकवाड )            अमळनेर ता...

 अमळनेर तालुक्यातील युरियाची टंचाई संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन. 


  

 अमळनेर प्रतिनिधी

(संपादक हेमकांत गायकवाड )         

  अमळनेर तालुक्यात युरिया खताची कृतींचा निर्माण करणारे वितरक यांच्यावर तात्काळ कारवाई करून अमळनेर तालुका शेतकरी संघ व अमळनेर तालुका फ्रुट सेल सोसायटी यांना तात्काळ खत युरिया व इतर खते उपलब्ध करावी यासंदर्भात शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश अर्जुन पाटील तसेच प्रवीण गोसावी , रवी पाटील यांनी जळगाव जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देऊन मागणी केली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की अंमळनेर तालुक्यात युरिया खताची कृत्रिम टंचाई दाखवून खत विक्रेता दुकानदार वितरक व संबंधित भरारी पथक यांनी संगमत करून तालुक्यात युरिया खताची व इतर खतांची कृत्रिम टंचाई निर्माण केली असून व्यापारी मंडळी भाव वाढवून शेतकरी राजास अडचणीत आणून लूट अडवणूक करीत आहेत .सतत आवर्षण प्रवनक्षेत्र अमळनेर तालुका दुष्काळग्रस्त असून देखील अमळनेर शहरात तालुक्यात युरिया खताची कृत्रिम टंचाई दाखवलेली आहे .तालुक्यात दरवर्षी रासायनिक खतांची टंचाई पासून खाजगी कृषी केंद्र, व्यापारी यांनी कायम कृत्रिम टंचाई दाखवलेली आहे संबंधित आपल्या अधिपत्याखाली अधिकारी यांनी खताचा मोठा पुरवठा देऊन देखील खत विक्रेता, दुकानदार ,वितरक कृत्रिम टंचाई दाखवून जादा दराने खत विक्री करून बळीराजाची फसवणूक करून स्वतःच्या फायद्यासाठी बळीराजाला आर्थिक संकटात टाकतात अमळनेर तालुक्यातील सर्व विकास सोसायटी अमळनेर तालुका शेतकरी संघ अमळनेर तालुका फ्रुट सेल सोसायटी शासनाच्या सहकारी क्षेत्रातील संस्था जादापुरवठा आपल्या आदेशाने झाल्यास बळीराजास जादा दराने खत खरेदी करण्याची आवश्यकता राहणार नाही .तरी याची तात्काळ दखल घेऊन युरिया खताचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. संबंधित कृषी अधीक्षक यांनी या बाबीची तात्काळ दखल घेऊन तालुका स्तरावर खत विक्रेता वितरक यांच्या दुकानाची व गोडाऊनची तपासणी करून शेतकऱ्यांना मुबलक युरिया उपलब्ध करून द्यावा . संबंधित निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे , जळगाव जिल्हा पालकमंत्री,कृषी मंत्री तसेच नाशिक आयुक्त यांच्याकडेही देण्यात आले आहेत. या निवेदनावरती प्रवीण पाटील रवी पाटील यांच्या देखील स्वाक्षरी आहेत .

No comments