तेजल महाजन ए.टी.डी.च्या प्रथम वर्षी 100% गुण मिळाले म्हणून केला सत्कार. प्रा. सुधीर महाले प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) - एरंडोल...
तेजल महाजन ए.टी.डी.च्या प्रथम वर्षी 100% गुण मिळाले म्हणून केला सत्कार.
प्रा. सुधीर महाले प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
- एरंडोल येथील देशमुख मढीवरील भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ता रवींद्र यादव महाजन यांची कन्या तेजल रवींद्र महाजन हिला ए.टी.डी.च्या प्रथम वर्षी 100% गुण मिळाले म्हणुन तिचा सत्कार करण्यात आला.
यावेळी तेजल रवींद्र महाजन हीचा सत्कार भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पश्चिम) अध्यक्ष डॉ. राधेश्यामजी चौधरी,एरंडोल-रिंगणगाव-मंडळाचे अध्यक्ष योगेश युवराज महाजन, शहरअध्यक्ष नितीन महाजन, निलेश परदेशी, अमरजितसिंग पाटील,माजी नगरसेवक जगदीश ठाकूर, नरेश ठाकरे,छोटू शिरसागर, दिगंबर बोरसे,नाना देसले,गुड्डू ठाकूर,आनंद सूर्यवंशी,मयूर ठाकूर, तेजलचा परिवार आदी उपस्थित होते.याप्रसंगी तेजल रवींद्र महाजन हिने जळगाव जिल्हाध्यक्ष (पश्चिम) डॉ. राधेश्यामजी चौधरी यांचा फोटो स्वतःच्या हाताने स्केच करून त्यांना सप्रेम भेट दिला.

No comments