पटेल स्पेशालिटी क्लिनिक तर्फे डॉक्टर डे निमित्त मोफत आरोग्य शिबीर संपन्न डॉक्टर म्हणजे केवळ फक्त वैद्य नाहीत तर ते समाजाचे खरे आधारस्तंभ ...
पटेल स्पेशालिटी क्लिनिक तर्फे डॉक्टर डे निमित्त मोफत आरोग्य शिबीर संपन्न
डॉक्टर म्हणजे केवळ फक्त वैद्य नाहीत तर ते समाजाचे खरे आधारस्तंभ - शेख
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
डॉक्टर म्हणजे केवळ फक्त वैद्य नाहीत, तर ते समाजाचे खरे आधारस्तंभ आहेत, त्यांच्या सेवेचे आपण ऋणी आहोत, थायरॉईड, लिपिड प्रोफाईल, शुगर व चरबी अशा अनेक महत्वाच्या आरोग्य तपासण्या वीना मुल्य मोफत करून देणे हा खरोखरच पटेल स्पेशालिटी क्लिनिक चा एक स्तूत्य असा समाजोपयोगी आणि आदर्श उपक्रम आहे.
आज अनेक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आणि आपल्या आरोग्याबाबत जागरूकता वाढवली हीच खऱ्या अर्थाने या उपक्रमाची यशोगाथा आहे.अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन पुढेही सुरू राहो ही अपेक्षा अल करम हॉस्पिटलचे इमरान शेख (भाईजान) यांनी व्यक्त केली.
नगर शहरातील किंग्जगेटरोड रामचंद्र खुंट येथील पटेल स्पेशालिटी क्लिनिकच्या वतीने डॉक्टर डे निमित्त मोफत रक्तातील थायराईड,चरबी, लिपीड प्रोफाईल, शुगर व इतर रक्त तपासण्या व निदान आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी डायबेटोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट डॉ. अशपाक पटेल, अल करम हॉस्पिटलचे तौफिक तांबोली,इमरान शेख भाईजान, मखदुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या सचिव डॉ. कमर सुरुर आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी डॉ. अशपाक पटेल यांनी रुग्णांची तपासणी केली. रक्त तपासण्या तुषार वर्पे, किरण वर्पे, अजीज पठाण, वसीम शेख यांनी केले. या शिबीरात अनेक रुग्णांनी याचा लाभ घेतला.
वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान - अ.नगर
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments