adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पंढरपूर तालुका पोलिसांची दमदार कामगिरी...!! एकूण 11 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत..!!

 पंढरपूर तालुका पोलिसांची दमदार कामगिरी...!!  एकूण 11 लाख  रुपयांचा मुद्देमाल हस्तगत..!!   सौ. कलावती गवळी ( सोलापूर जिल्हा ) प्रतिनिधी.  (स...

 पंढरपूर तालुका पोलिसांची दमदार कामगिरी...!!  एकूण 11 लाख  रुपयांचा मुद्देमाल हस्तगत..!! 


 सौ. कलावती गवळी ( सोलापूर जिल्हा ) प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे गुरसाळे या गावी दिनांक रोजी 30/6/2025 फिर्यादी नामे  रुपेश अजितराव देवकाते (वय 27) रा.घोसाळे यांच्या मालकीच्या शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या दोन पाण्याच्या मोटरी चोरीस गेल्या बाबत पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा राजी  नंबर 544/25BNS 303 अन्वये गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याच्या तपास कामी पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांनी त्वरित प्रभावाने शेतकऱ्यांच्या मोटारी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलिसांनी एकूण चार आरोपींची नावे निष्पन्न करून त्यापैकी दोन आरोपींना ताब्यात घेवुन त्याच्याकडे सखोल तपास करून एकूण पाच शेती पंपाच्या पाण्याच्या मोटरी किंमत रुपये दोन लाख पंधरा हजार व एक मोटरसायकल असा एकूण दोन लाख 35 हजार 235000 रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी हस्तगत केलेला असून आणखीन सदर मोठा चोरीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलीस तपास करत आहेत तसेच वेळापूर येथील आषाढी वारीच्या वेळेस दोन जुलै 2025 रोजी महिंद्रा कंपनीचा स्वामी दत्तकृपा दिंडीतील वारकरी दिंडी पालखी मधील ट्रॅक्टर चोरीला गेलेला होता त्याबाबत पंढरपूर तालुका पोलिसांनी तपास करून चोरीस गेलेला ट्रॅक्टर मौजे चळे या गावातून जप्त केलेला आहे. या बाबत वेळापूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 251/ 25 बी एम एस कलम 303 2 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर व पाण्याच्या शेतीपंपासाठी वापरणाऱ्या मोटरी एकूण पाच तसेच एक मोटरसायकल असा एकूण 11 लाख 1100000 रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी मुद्देमाल जप्त केलेला आहे. जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टर बाबत वेळापूर पोलीस स्टेशन येथे पुन्हा दाखल आहे. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली

 पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय मुजावर पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले पोलीस उपनिरीक्षक विक्रम वाढणे सहाय्यक फौजदार शेंडगे पोलीस हवालदार घंटे पोलीस हवालदार सय्यद बालाजी कदम सुधीर शिंदे दीपक भोसले सुहास देशमुख  गजानन माळी सागर गवळी चालक पोलीस कॉन्स्टेबल नदाफ गोडसे यांच्या पथकांने कामगिरी केली आहे.

No comments