शिवश्री प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेला शाई फेक हल्ला हा त्यांच्यावर नसून बहुजनवादी विचारसरणीवर आहे ....जगदीश मानवतकर वाशिम.... वाशीम...
शिवश्री प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेला शाई फेक हल्ला हा त्यांच्यावर नसून बहुजनवादी विचारसरणीवर आहे ....जगदीश मानवतकर वाशिम....
वाशीम प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेला हा भ्याड हल्ला व शाई फेक प्रकरण हे काही एका व्यक्तीवर नसून तर ते शिव - लहू - फुले - शाहू- आंबेडकर- साठे यांच्या बहुजनवादी विचारसरणीवर आहे. त्यामुळे त्यांना खतपाणी घालणाऱ्या पक्षांना आणि संघटनेला एवढेच सांगावसं वाटते की ,अशा भ्याड हल्ल्यांना आम्ही किंवा प्रवीण दादा गायकवाड हे कदापिही घाबरणार नाही . त्यामुळे अशा मनुवादी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी आणि पक्षांनी हे लक्षात ठेवावे.
2014 साली वाशिम मध्ये छत्रपती शिवरायांचे वंशज संभाजी महाराज यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी प्रवीण दादा गायकवाड आणि माझी भेट झाली होती.
अवघ्या 15 ते 20 मिनिटाच्या भेटीमध्येच त्यांच्या मधील विचारधारा आणि अभ्यासू वृत्ती लवकरच माझ्या लक्षात आली. प्रवीण दादा गायकवाड हे गेल्या 20 ते 30 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड या पक्षामध्ये अविरत काम करीत आहेत . मी जरी मातंग समाजाचा असलो तरी मराठा सेवा संघाचा आणि संभाजी ब्रिगेड यांच्या विचारधारेचा पाईक आहे. कारण मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड ही कधीही जात, धर्म ,पंथ पाहत नाही . मी मालेगावचा रहिवासी असून सध्या वाशिम मध्ये बहुजन विचारसरणी काम करीत आहे . माझे गुरुवर्य जे की मराठा सेवा संघाचे आहेत शिवश्री वसंतराव अवचार सर आणि शिवश्री भारत आव्हाळे सर हे माझे गुरु आहेत . त्यांनी मला मराठा सेवा संघाच्या कार्यक्रमाला अनेक वेळा बोलवलो परंतु जेव्हा मी शिबिराला गेलो तेव्हा कधीही मला माझी जात ,धर्म, पंथ पाहून दूजाभाव केला नाही. त्यामुळे मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड यांच्या अनेक कार्यक्रमाला आणि शिबिराला स्वतःहून हजर राहत गेलो. जेव्हा आपण मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड यांच्या शिबिराला जातो तेव्हा तेव्हा काहीतरी नवीन शिकायला नक्की मिळते. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यक्रमाला आणि शिबिराला गेल्यामुळे मला छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज , क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे, तथागत गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज ,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे , त्याग माता सावित्रीबाई फुले, त्याग माता रमाई , भिमाई ,राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब ,अहिल्याबाई होळकर त्यासोबतच बिरसा मुंडा, पंजाबराव देशमुख, क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या सह अनेक महापुरुषांच्या इतिहासामध्ये डोकवण्याची संधी मला भेटली.
मी अकोट मध्ये 2008 यावर्षी श्री शिवाजी विद्यालयात बारावी मध्ये असताना तेथील संभाजी ब्रिगेडचे तत्कालीन तालुका अध्यक्ष शिवश्री विवेक कोल्हे , तालुका उपाध्यक्ष शिवश्री गुड्डू पाचडे यांच्यासोबत कॉलेज झाल्यावर संभाजी ब्रिगेड चे कार्य करीत होतो. ज्यावेळी जेम्स लेन प्रकरणाचा उलगडा झाला होता तेव्हा मी अवघ्या 17 वर्षाचा असताना अकोटमध्ये रास्ता रोको आंदोलन आणि अनेक वाहनांच्या काचा फोडल्या होत्या . हे मला आजही चांगली आठवते. जेम्स लेन प्रकरणांमध्ये जिजाऊंची बदनामी करण्याचा षडयंत्र या मनुवादी व्यवस्थेने केला होता. परंतु मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड यांच्या विचारधारेमुळेच हा प्रयत्न आणून पाडण्यात आला आणि जमलेला मदत करणारी भंडारकर संस्था फोडण्यात आली.याचे सर्वश्रेय मराठा सेवा संघाचे सर्वेसर्वा शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांना जाते . बामसेफचे सर्वेसर्वा आदरणीय वामन मेश्राम साहेब आणि मराठा सेवा संघाचे आदरणीय शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर असल्याने मी मराठा सेवा संघाच्या आणि बामसेफच्या अनेक कार्यक्रमाला हजेरी लावत असतो. या दोघांच्याही विचारसरणीमध्ये साम्यता असल्याने मला यांच्या कार्यक्रमाला जाण्याचे मनापासून वाटते. कारण संत ज्ञानेश्वर महाराजांपासून तर आत्ताच्या प्रवीण दादा गायकवाड या प्रकरणापर्यंत या ब्राह्मणी व्यवस्थेने बहुजन महापुरुषांचे विटंबना, त्यांची विचारधारा आणि त्यांना संपण्याचा कसा डाव केला हे मला या दोघांच्या विचारधारेमुळे कळाले आहे. अकोला जिल्ह्याचे तत्कालीन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पंकज दादा जायले आणि अकोट मधील संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मुळेच माझ्या विचारांमध्ये कॉलेज जीवनापासून अमुलाग्र बदल झाला आहे. मला बाल वयात आली तरुणपणात या दोघांच्या विचाराचा प्रभाव झाल्याने मी सुद्धा समाजकार्यात स्वतःला गेल्या 15 ते 20 वर्षापासून वाहून घेतले आहे. मी 2014 साली स्वतःची छत्रपती शिवाजी ब्रिगेड सामाजिक संघटना स्थापन केली होती आणि त्याचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रात स्थापन केले होते. त्याचे सर्व श्रेय फक्त शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनाच जाते. आताही मी यांच्या विचारधारेचां पाईक असून मी माझे कार्य करीत आहे. छत्रपती शिवाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेतून अनेक छोटे कक्ष जसे की नऊ स्वराज्य ग्रुप , मानव सेवा ब्लड ग्रुप ,ऑल इंडिया ब्ल्यू टायगर सेना, शहीद पोचीराम कांबळे विचार मंच, अखिल भारतीय स्वाभिमानी कलावंत मंच अशा छोटे कक्ष स्थापन करून कार्य करीत आहे आणि मराठा सेवा संघाच्या तसेच संभाजी ब्रिगेडच्या अनेक कार्यक्रमाला म्हणजे हजेरी देत आहे. मला मराठा सेवा संघाच्या मालेगाव मधील प्राध्यापक निकस सर, प्राध्यापक आव्हाळे सर, प्राध्यापक अवचार सर यांच्यासारख्या बऱ्याच शिक्षकांनी वेळोवेळी पुस्तकांची मदत करून मला वाचन करण्यास मदत केली आहे. त्या सोबतच मालेगाव मधील जे . एस.शिंदे साहेब ,एडवोकेट के.एन.साळुंखे साहेब यांच्यासारख्या बऱ्याच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मदत केलेली आहे. वाशिम मध्ये अनेक आंदोलन असो अनेक सभा असो प्रत्येकांना मी हजेरी देत असतो. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड हे प्रत्येक जातीतील महापुरुषांची व्यवस्थितपणे मांडणी करून त्यांच्या वर इतिहासामधून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करीत असते.
संभाजी ब्रिगेडमध्ये एकेरी उल्लेख होत असल्याने प्रवीण गायकवाड प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेड यांच्यावर केलेला हल्ला हा खूपच हास्यपद आहे. कारण छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास मातंग, बौद्ध,आदिवासी इतर मागासवर्गीय समाज यांच्यापर्यंत नेण्याचे कार्य संभाजी ब्रिगेड यांनी केले आहे. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड यांनी महाराष्ट्रात वाढत जाणाऱ्या हिंदू वी मुसलमान ,दलित वी सवर्ण यांच्यातील दंगली आणि जातीय अत्याचार खूपच कमी केला आहे . मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड यांनी अनेक कॅडर बेस्ट कॅम्प लावून लोकांच्या डोक्यातील घाण साफ केली आहे. संभाजी ब्रिगेड ही संघटना जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,आद्य क्रांति वीर लहुजी वस्ताद साळवे , महात्मा ज्योतिबा फुले , साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या अनेक महापुरुषांची जेव्हा बदनामी होते तेव्हा रस्त्यावर येते. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी जेव्हा डॉक्टर प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर , भाजपाचा नगरसेवक छिदंम यांनी केली होती. तेव्हा शिवप्रतिष्ठान फाउंडेशनचां अध्यक्ष सांगण्यात येणारा दीपक काटे कुठे बिळात जाऊन बसला होता. मनोहर भिडे यांनी जेव्हा महात्मा ज्योतिबा फुले यांची बदनामी केली होती तेव्हा या संघटना शांत होत्या. कोशारी यांनी जेव्हा महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांची विटंबना केली होती तेव्हा या संघटना काय बिळात जाऊन लपल्या होत्या का ? असा प्रश्न निर्माण होतो . भारतामध्ये भारतीय संविधान संपुष्टात आणून मनुस्मृती लादण्याचा प्रयत्न जनसंघाचे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टी करत आहे .
हे अशा प्रकरणातून दिसून येतो . जन सुरक्षा अधिनियम कायदा पारित करायचा ज्यामधून डाव्या विचारसरणीच्या सर्व संघटना या बंद पाडायच्या आणि फक्त उजव्या विचारसरणीच्या संघटना या अस्तित्वात ठेवायचा असा बामणी करावा महाराष्ट्र सरकार करत आहे. आज प्रवीण दादा गायकवाड हे सुदैवाने अनुचित प्रकारापासून वाचले परंतु भविष्यामध्ये मराठा सेवा संघाचे सर्वेसर्वा पुरुषोत्तम खेडेकर साहेब , बामसेफचे अध्यक्ष माननीय वामन मेश्राम साहेब, अनिसचे श्याम मानव साहेब, सेवानिवृत्त न्यायमूर्ती कोळसे पाटील यांच्यासारख्या बहुजनवादी विचारसरणीच्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर भविष्यात जीव घेणा हल्ला होऊ शकतो हे अशा प्रकरणातून दिसून येते. प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला हा फक्त एक इशारा होता आणि चाचपणी होती की असा हल्ला झाल्यावर हे लोक काय करतात. परंतु छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर , क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे , साहित्य अण्णाभाऊ साठे यांच्या विचारधारेत वाढलेले असल्याने अशा हल्याना आणि टीकेला प्रवीण दादा गायकवाड आणि माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते हे भिकही घालत नाहीत हे या मनुवादी व्यवस्थेने लक्षात ठेवावे. शिवश्री प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड शाई हल्ल्याचा माझी ऑल इंडिया ब्लू टायगर सेना आणि सर्व कक्ष वतीने जाहीर निषेध करण्यात येतो आणि महाराष्ट्र सरकारला एक मागणी करण्यात येते की, महाराष्ट्रातील बहुजनवादी विचारसरणीत काम करणाऱ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आपण सुरक्षा पोहोचवावी अन्यथा आमच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची सुरक्षा करण्यास आम्ही सक्षम आहोत. प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा दीपक काटे हा कोणाचा सूत्रधार आहे ? या प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण आहे ? ही योजना कोणी केली होती ? त्यादिवशी कोण कोण या प्रकरणात सामील होते ? आणि या आरोपींना कदडक शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मी संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या वतीने आणि माझ्या संघटनाच्या वतीने करीत आहे.
संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष शिवश्री गजानन भाऊ भोयर आणि मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री नारायण काळबांडे सर यांनी आम्हाला कधीही आवाज द्यावा वाशिम जिल्ह्यातील समस्त मातंग समाज ,माझी संघटना , कार्यकर्ते समर्थक आणि स्वतः मी आपल्यासोबत पुढील निषेध मोर्चामध्ये किंवा आपल्या आयोजित केलेल्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये नक्कीच उपस्थित राहू .असा आशय देतो आणि संभाजी ब्रिगेडच्या पुढील कार्यास शुभेच्छा
प्रवीण दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है!
मुख्यमंत्री साहेब होश मे आओ !
गृहमंत्री साहेब होश मे आओ !
अक्कलकोट प्रकरणाचा जाहीर निषेध !
मनुवादी व्यवस्थेचा जाहीर निषेध !
भारतीय संविधान जिंदाबाद !
मनुस्मृति मुर्दाबाद !
जय जिजाऊ ! जय शिवराय !
जय लहुजी ! जय भीम !
जय अण्णा ! जय संविधान !
तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ ! जय शिवराय !
जगदीश मानवतकर वाशिम
अध्यक्ष ऑल इंडिया ब्लू टायगर सेना 9307391785.
No comments